कोण आहे शुभम शेळके, ज्याला जिंकवण्यासाठी संजय राऊत, तर हरवण्यासाठी फडणवीस जीवाचं रान करतायत?

Belgaum Lok sabha bypoll : बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक (Belgaum Lok sabha bypoll) होत आहे.

कोण आहे शुभम शेळके, ज्याला जिंकवण्यासाठी संजय राऊत, तर हरवण्यासाठी फडणवीस जीवाचं रान करतायत?
Shubham Shelke
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 6:14 PM

बेळगाव : बेळगावात सध्या शिवसेना-भाजपची चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक (Belgaum Lok sabha bypoll) होत आहे. इथे भाजपकडून मंगला अंगडी तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 26 वर्षीय उमेदवार शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी शिवसेनेने ताकद लावली आहे. कोल्हापूरमधील हातकणंगलेचे सेना खासदार धैर्यशील माने हे सध्या बेळगावात तळ ठोकून आहेत, तर सेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनीही रोड शो आणि रॅली काढून बेळगाव दणाणून सोडलं. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज इथे जाहीर सभा घेत आहेत. आज सायंकाळी 7 वाजता प्रचार संपणार असून, 17 तारखेला इथे मतदान होणार आहे. (Belgaum Lok sabha bypoll Who is Shubham Shelke where Sanjay Raut and Devendra Fadnavis taking rallys for him)

भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी तिरंगी लढत इथे होत आहे. 2 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

बेळगावात पोटनिवडणूक

येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री दिवगंत सुरेश अंगडी यांच्या पत्नी श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे माजी मंत्री आणि यमकणमर्डीचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतिश जारकिहोळी यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 26 वर्षीय तरुणाला उमेदवारी

दोन राष्ट्रीय पक्षांव्यतिरीक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे 26 वर्षीय उमेदवार शुभम शेळके सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर उर्वरित 6 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत मराठी भाषिक नेमकं काय करणार? याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.

शुभम शेळकेंना मराठी भाषिकांचा पाठींबा

शुभम शेळके यांना बेळगाव ग्रामीण, उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील मराठा, मराठी भाषिक समाजाचा भक्कम पाठींबा आहे. शुभम शेळके हे युवा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे करोडपती आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत. पण शुभम शेळके या युवकाला मराठा समाजाने भरघोस पाठींबा दिला आहे. तरीही निवडणुकीत मराठी भाषिक कोणाच्या पाठीशी राहणार आणि कानडी अत्याचार, वादग्रस्त झेंडा या सगळ्याचा वचपा काढणार का? हे पाहावं लागणार आहे.

कार्यकर्त्यांनी डिपॉझिट, समितीने फॉर्म भरला, कोण आहेत शुभम शेळके?

शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनी डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता.

शुभम शेळके यांचं शिक्षण sslc झालं आहे. लहानपणापासून त्यांनी आंदोलन जवळून पाहिले आहे. सीमाप्रश्नाची झालेली वाताहतीमुळे त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागील पाच वर्षात शैक्षणिक उपक्रम, मराठी शाळांना मदत यासोबत सीमा आंदोलनात भाग घेतला.

युवा समितीने सीमा भागातील युवकांना एकत्रित करून, या चळवळींमध्ये युवकांना प्राधान्य दिले. त्यामुळेच आज शुभम शेळके यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

संबंधित बातम्या  

आधी संजय राऊतांना मैदानात उतरवलं, आता स्वत: सायकलवर प्रचार, धैर्यशील मानेंनी बेळगाव पिंजलं!

Belgaum Bypoll: ‘देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल’

बेळगावची मराठी जनता कुणाचं ऐकणार? राऊतांचं की फडणवीसांचं? राऊतानंतर आता फडणवीस दौऱ्यावर

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.