आधी संजय राऊतांना मैदानात उतरवलं, आता स्वत: सायकलवर प्रचार, धैर्यशील मानेंनी बेळगाव पिंजलं!

आधी संजय राऊतांना मैदानात उतरवलं, आता स्वत: सायकलवर प्रचार, धैर्यशील मानेंनी बेळगाव पिंजलं!
खासदार धैर्यशील माने यांचा सायकलवर प्रचार

खासदार धैर्यशील माने बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेचे उमेदवार शुभम शेळके यांचा अजेंडा मांडत आहेत. (Belgaum Loksabha bypoll Dhairyasheel Mane )

अनिश बेंद्रे

|

Apr 15, 2021 | 2:18 PM

बेळगाव : बेळगावात लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने जोरदार ताकद लावली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शुभम विक्रांत शेळके हा 26 वर्षाचा तरुण लोकसभेच्या रिंगणात आहे. त्यासाठी शिवसेनेनेही जोर लावला आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगावात तळ ठोकला आहे. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावात रोड शो आणि जाहीर सभा घेतली. त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी आज सायकलवरुन फिरुन प्रचार केला. (Belgaum Loksabha bypoll Shivsena MP Dhairyasheel Mane campaigns on Cycle)

खासदार धैर्यशील माने सायकलवर

निवडणूक आल्यावर विविध संकल्पना लढवत उमेदवार प्रचार करत असतात. जास्तीत जास्त मतदारांचे लक्ष वेधून घेत चर्चेत राहण्यासाठी उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करत असतात. बेळगाव शहरात चक्क शिवसेना खासदाराने असा आगळावेगळा प्रचार केला. विमान, चारचाकी, दुचाकी अशी वाहने वापरात असताना शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने सायकलवर फिरत आहेत. खासदार धैर्यशील माने बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेचे उमेदवार शुभम शेळके यांचा अजेंडा मांडत आहेत.

कोण आहेत धैर्यशील माने?

धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना खासदार आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात उतरलेले माजी खासदार राजू शेट्टी यांचा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. धैर्यशील माने यांनी तब्बल 93 हजार 785 मतांनी विजय मिळवला होता.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम ठेवण्यात आले आहे. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या शिवसेना प्रवक्त्यांच्या नव्या यादीत हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना स्थान मिळालेले नाही.

बेळगावात तिरंगी लढत

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या 17 एप्रिलला मतदान आहे. या निवडणुकीत भाजपाच्या मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी टक्कर आहे. पण आता शिवसेनेच्या खासदारांनी थेट सायकलवरुन फिरत समितीचा प्रचार सुरु केला आहे. त्यांच्या या प्रचारतंत्राला बेळगावकर कसा प्रतिसाद देतात हे मात्र 2 मे रोजी स्पष्ट होईल. (Belgaum Loksabha bypoll Shivsena MP Dhairyasheel Mane campaigns on Cycle)

सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या 

राजकारणातील नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ दाखवणारे धैर्यशील माने शिवसेना प्रवक्तेपदापासून दूर

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

नितीन गडकरी बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपचा प्रचार करणार का; संजय राऊतांचा सवाल

(Belgaum Loksabha bypoll Shivsena MP Dhairyasheel Mane campaigns on Cycle)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें