बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात संजय राऊथ यांनी बेळगाव प्रशासनाला एकप्रकारे इशाराच दिलाय.

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 5:48 PM

बेळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सभेची बेळगाव प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतल्याचं पाहायला मिळतंय. कारण, बेळगाव प्रशासनाकडून स्टेज आणि साऊंड सिस्टिम काढण्यासाठी दादागिरी करण्यात येत आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. तत्पूर्वी बेळगाव प्रशासनाची दादागिरी पाहायला मिळत आहे. मात्र, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात संजय राऊथ यांनी बेळगाव प्रशासनाला एकप्रकारे इशाराच दिलाय. (Breakdown of stage and sound system before Sanjay Raut’s campaign)

संजय राऊतांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

सभेची आणि साऊंड सिस्टिमची रितसर परवानगी घेतली असताना स्टेट, माईक तोडणं हे लोकशाहीचा, निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसतं? असा सवाल संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला विचारलाय. कलेक्टर किंवा अन्य ज्याने हे आदेश दिले आहेत, त्यांनी घटनेचा भंग केलाय. अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा लढा सुरुच राहिल. ही दडपशाही, दादागिरी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केलाय.

उमेदवार शुभम शेळकेंना वाढता प्रतिसाद

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांची तोफ बेळगावात धडाडणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार इथं ही सभा होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे युवकांचं आकर्षण ठरत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून बेळगावसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सभा घेण्याची घोषणा केलीय. त्याचाच भाग म्हणून संजय राऊत यांची सभा आज बेळगावमध्ये होत आहे. या सभेला हातकणंगलेचे शिवसेना खासदारधैर्यशिल माने यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

संबंधित बातम्या :

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावला जाणार

Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!

Breakdown of stage and sound system before Sanjay Raut’s campaign

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.