देशमुखांचा राजीनामा हे हिमनगाचं टोक, आगे आगे देखो…होता है क्या? गिरीश महाजनांचा इशारा

पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो...होता है क्या?" असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला. (Girish Mahajan Anil Deshmukh )

देशमुखांचा राजीनामा हे हिमनगाचं टोक, आगे आगे देखो...होता है क्या? गिरीश महाजनांचा इशारा
भाजप नेते गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 8:13 AM

मुंबई : “ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे” अशा शब्दात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सरकारवर निशाणा साधला. (BJP Leader Girish Mahajan on Anil Deshmukh resignation as Home Minister)

“राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरुवात असून पुढे अजून बरीच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?” असा इशारा महाजनांनी ट्विटरवरुन दिला.

“देशमुखांचा राजीनामा प्रचंड नाचक्कीनंतरचा”

“निगरगट्ट ठाकरे सरकारने पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.” असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला.

“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरूवात

“जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे” असा इशारा महाजनांनी दिला.

(BJP Leader Girish Mahajan on Anil Deshmukh resignation as Home Minister)

अनिल देशमुख यांचा राजीनामा

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा सन्मान ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. सीबीआय चौकशीदरम्यान पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी पक्षासमोर मांडली.

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

नव्या गृहमंत्र्यांचं नाव जाहीर, अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकृतीसाठीही पाठवला!

अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

(BJP Leader Girish Mahajan on Anil Deshmukh resignation as Home Minister)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.