AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी
| Updated on: Apr 05, 2021 | 3:21 PM
Share

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर  100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ती याचिका फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देत सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. (Anil Deshmukh Resignation letter to cm Uddhav Thackeray after Mumbai High court order)

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचं पत्र जसंच्या तसं

5 एप्रिल 2021

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे,

ही नम्र विनंती

आपला

अनिल देशमुख

आज काय घडलं?

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

भाजपकडून राजीनाम्याची मागणी

अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय कोर्टाने आज दिला आहे. 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी आणि पुढंची चौकशी करावी. जी वसुली या सरकारमध्ये होत होते त्याच सत्य समोर येईल. काळिमा फासणारा प्रकार आहे. हा जो मधला कारभार झाला आहेत त्यातील सत्य समोर येईल. काही लोकांनी प्रयत्न केला की सीबीआय चौकशी होऊ नये. त्याला जोरदार उत्तर मुंबई हायकोर्टने दिला आहे. आम्ही त्याच स्वागत करतो, अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा नाही तर मुख्यमंत्रीनी घ्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

मुंबई हायकोर्टानं  अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी  वाढल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये तातडीची बैठक झाली.  बैठकीनंतर अजित पवार सिल्वर ओकवरुन बाहेर पडले आहेत

संबंधित बातम्या: 

Anil Deshmukh resign: अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?

Anil Deshmukh Resignation letter to cm Uddhav Thackeray after Mumbai High court order

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.