Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अमरावती हिंसाचारावरुन सोमय्याचं टीकास्त्र

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 7.50 वाजता अमरावतीत पोहोचले. अमरावती रेल्वे स्टेशनवर भाजपने किरीट सोमय्यांचं जंगी स्वागत केले. अमरावतीत किरीट सोमय्या हे कोणाचा भंडाफोड करणार याबाबत सध्या उत्सुकता लागलेली आहे.

Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अमरावती हिंसाचारावरुन सोमय्याचं टीकास्त्र
किरीट सोमय्या, भाजप नेते

अमरावती : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 7.50 वाजता अमरावतीत पोहोचले. अमरावती रेल्वे स्टेशनवर भाजपने किरीट सोमय्यांचं जंगी स्वागत केले. अमरावतीत किरीट सोमय्या हे कोणाचा भंडाफोड करणार याबाबत सध्या उत्सुकता लागलेली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत झालेल्या हिंसाचाराचा देखील ते आढावा घेणार आहेत. त्यामुळे अमरावती हिंसाचाराबाबत ते नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष लागून आहे. तर, दुसरीकडे जर बघितले तर किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास सरकारमधील डझनभर लोकप्रतिनिधींना लक्ष केले आहे. त्यांच्यावरील आरोपानंतर अनेकांना ईडीचा सामना करावा लागला आहे.

अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा ते घोटाळा उघडकीस आणणार आहेत, असा दावा करण्यात येत आहे. तर या संदर्भात दुपारी 12 वाजता किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होणार असून ते या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागले आहेत.

मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, म्हणून आज मी अमरावतीत आलोय – किरीट सोमय्या

यावेळी, किरीट सोमय्या यांनी टीव्ही-9 मराठीशी बातचीत करताना सांगितलं की, “उद्धव ठाकरे आणि ठाकरे-पवारांचे सरकार यांचे घोटाळे बाहेर आले तरीही किरीट सोमय्यालाच थांबवतात. कोल्हापुरातही सोमय्यालाच थांबवलं. हिंदुंवर अत्याचार होत असतात तेव्हा देखील तिथे जाण्यास किरीट सोमय्यांवर प्रतिबंध लावले जातात. 12 नोव्हेंबरला ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या समर्थनाने तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आलं. त्याच दिवशी मला यायचं होतं, पण मला प्रतिबंध घातला. मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, म्हणून आज मी अमरावतीत आलोय.”

उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला – किरीट सोमय्या

“हे काँग्रेस तर हिंसाचार म्हणतेच, पण उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे हे 1992-93 च्या दंगलीत रस्त्यावर उतरले होते. आता हिंदू मार खाणार नाही आणि उद्धव ठाकरे त्या मुस्लिमांचे तीन ठिकाणी मोर्चे निघाले दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले तर हिंसाचारल म्हणता. हा मुस्लिमांचा अत्याचार आहे, उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीये.

संबंधित बातम्या :

Chandrakant Patil | शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Jalgao : आमचा 25 वर्षांचा संसार मोडला, गिरीश महाजन यांचा टोला, महाजनांना जयंत पाटील, नवाब मलिकांचं प्रत्युत्तर

Published On - 10:48 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI