Jalgaon : आमचा 25 वर्षांचा संसार मोडला, गिरीश महाजन यांचा टोला, महाजनांना जयंत पाटील, नवाब मलिकांचं प्रत्युत्तर

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावरून गिरीश महाजन यांनी आमचा 25 वर्षांचा संसार होता तो तुम्ही मोडला, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील, असंही महाजन म्हणाले.

Jalgaon : आमचा 25 वर्षांचा संसार मोडला, गिरीश महाजन यांचा टोला, महाजनांना जयंत पाटील, नवाब मलिकांचं प्रत्युत्तर
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 4:24 PM

जळगाव : जळगावात गुलाबराव पाटलांच्या मुलाच्या लग्नात सर्व नेते मंडळी एकत्र आले होते, परंतु लग्न सोहळ्यातही एकमेकांना राजकीय टोलेबाजी करताना दिसून आले. सत्ताधाऱ्यांना आधी गिरीश महाजन यांनी टोला लावला, त्यानंतर महाजन यांना राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आमचा 25 वर्षांचा संसार तुम्ही मोडला

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावरून गिरीश महाजन यांनी आमचा 25 वर्षांचा संसार होता तो तुम्ही मोडला, असा टोला सत्ताधाऱ्यांना लगावला. विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील, असंही महाजन म्हणाले. यावेळीही भाजपची सत्तेतून बाहेर राहिल्याची खदखद दिसून आली. त्याला जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनीही तसंच मिश्कील उत्तर दिलंय.

महाजनांची खंत आहे, लक्ष देऊ नका

महाजनांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे. असंही जयंत पाटील म्हणालेत. गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय.  महाजन यांनी आज संसार जुळत असताना, आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे, ते अपशब्द बोलतात. असा टोला नवाब मलिक यांनी लगावलाय. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपकडून या सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याला तशीच प्रत्युत्तरे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देण्यात आली. गुलाबराव पाटलांच्या मुलाचे लग्न जरी कौटुंबीक कार्यक्रम असला तरी तिथे सर्व पक्षाचे नेते एकत्र आल्यानंतर एकमेकांना टोलेबाजी करायला मात्र विसरले नाहीत.

Special Report | एसटीचा संप सुरु असताना भाजपनं आझाद मैदान सोडलं, पण पाठिंबा कायम?

प्रयागराज हत्याकांड: एकतर्फी प्रेमातून चौघांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा

Special Report | लोकांसाठी दंडाचा घाट मात्र नेत्यांच्या लग्नाचा शाही थाट

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.