AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी, शेलारांचा हल्लाबोल

आशिष शेलार म्हणाले, "भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. त्यांनी आधी विधानसभेत गैरवर्तन केलं होतं, आता जाहीर कार्यक्रमात केलं" 

भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी, शेलारांचा हल्लाबोल
भाजप नेते आशिष शेलार
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 12:56 PM
Share

मुंबई : “शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी तर विधानसभेत गैरवर्तन केलं होतं. काल जाहीर कार्यक्रमात त्यांनी तेच केलं. आपल्या मालकाला खूश करण्यासाठी हे करतात”, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी हल्लाबोल केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या महिलेला अरेरावीची भाषा वापरली होती. त्यावर शेलारांनी घणाघात केला.

आशिष शेलार म्हणाले, “भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. त्यांनी आधी विधानसभेत गैरवर्तन केलं होतं, आता जाहीर कार्यक्रमात केलं”

पूरग्रस्तांना मदत

झालेली दुर्घटना आणि यावर दीर्घकालीन तोडगा आणि शाँर्टटम मदत द्यायला हवी. त्यात सरकार कुचराई करत आहे. दिलदारी मुंबई आणि महाराष्ट्रानेही दाखवली पाहिजे. तर बॉलिवूडनेही दाखवावी याबाबत आम्हीही सहमत आहोत, असं शेलारांनी सांगितलं.

शिवसेनेची मुंबईकरांशी गद्दारी

यावेळी आशिष शेलार यांनी तुंबणाऱ्या मुंबईवरुन शिवसेनेवरही हल्लाबोल केला. शेलार म्हणाले, “आज 26 जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. कित्येक वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एव्हढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर”

कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कोट्यावधी रुपयांचे प्रोजेक्टच्या नावाखाली १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा अर्थसंकल्प खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय.. तर तेच. मग हे पैसे गेले कुठे सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं? हे पैसे पाण्यात गेले आणि मुंबईकरांचे जीव टांगणीला लागले आहेत. मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजलंय का? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का? पम्पिंग स्टेशनचं काय झालं? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

राज कुंद्रांबाबत तत्कालीन गृहमंत्र्यांचं हास्यास्पद उत्तर

राज कुंद्राच्या या व्हिडिओबाबत आम्ही वारंवार प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले. हास्यास्पद उत्तर तत्कालिन गृहमंत्र्यांनी दिली. जणूकाय महाराष्ट्र सरकारचा याला राजाश्रय होता का असे दिसतेय. एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार चाईल्ड पोर्नग्राफीच्या क्लिप वायरल केल्या आहेत. २०१७ ते २०१९ कार्यकाळात ४५% पोक्सोचे गुन्हे दाखल झालेत. अनेक अश्लील अँपचे रँकेट आहे. जे एका ड्रग्ज तस्करांप्रमाणे कार्यरत आहे, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

यामुळेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन हे प्रकरण निदर्शनास आणून दिलेलं आहे. राज कुंद्रांप्रमाणे अनेक जण यात गुंतलेलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. काही तरुण तरुणींची यात पिळवणूक होते का? नाईट लाईव्हच्या पुरस्कर्त्यांनी आता याकडे लक्ष द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या 

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिलं भाष्य, रोखठोक बोलणारे संजय राऊत म्हणतात….

भास्कर जाधवांना जनतेची अॅलर्जी? मुख्यमंत्र्यांसमोर पीडित महिलेच्या मुलाला म्हणाले, आईला समजव ! नेमकं काय घडलं?

(BJP MLA Ashish Shelar criticizes Shiv Sena MLA Bhaskar Jadhav over Chiplun threatening issue also demands Rajn Kundra case should be enquired by central agencies)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.