भास्कर जाधवांच्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिलं भाष्य, रोखठोक बोलणारे संजय राऊत म्हणतात….

शिवसेना नेते भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील (Chiplun) दमदाटीवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिलं भाष्य, रोखठोक बोलणारे संजय राऊत म्हणतात....
Sanjay Raut_Bhaskar Jadhav
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Jul 26, 2021 | 10:43 AM

मुंबई : शिवसेना नेते भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील (Chiplun) दमदाटीवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणात मात्र संयमी प्रतिक्रिया दिली. “भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला भास्कर जाधवांनी दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यावर संजय राऊत यांनी भास्कर जाधवच याबाबत भाष्य करतील असं सांगितलं.

मुंबईतील श्रीमंतांनी महाराष्ट्राला उभं करण्यासाठी पुढे यावं

महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत, मोठे नुकसान झाले. अनेकांचे जीव गेले आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत त्या सगळ्यांना आता सावरायचं आहे. महाराष्ट्र सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावे. महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल. सरकार आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पण ही सगळ्यांची जबाबदारी आहे, महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिले, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती महाराष्ट्राला उभं करायची. राज्याला सहस्त्र हातांनी मदत होणे आवश्यक आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत. त्यांनी सुद्धा मदत करायला हवी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमकं काय घडलं? 

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याचवेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

VIDEO : महिला व्यापाऱ्याचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो

संबंधित बातम्या  

भास्कर जाधवांना जनतेची अॅलर्जी? मुख्यमंत्र्यांसमोर पीडित महिलेच्या मुलाला म्हणाले, आईला समजव ! नेमकं काय घडलं?

VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें