VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू

दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा भास्कर जाधव यांनी धावत जवळ येत "साहेब, तुम्ही हात नका जोडू" अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.

VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू
भास्कर जाधव, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 9:04 PM

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. हा संवाद कॅमेरात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

“तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करु नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. चिपळूण बाजारपेठेतील काही दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा भास्कर जाधव यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.

भास्कर जाधवांचा तिळपापड का झाला?

त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थोडा पुढे सरकला. भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचं नुकसान झाल्याचं ओरडून ओरडून सांगत होती. मदतीची याचना करत होती. ही मला रडतच आपल्या भावना व्यक्त करत होती. तिचा हा आक्रोश ऐकून मुख्यमंत्री थोडावेळ थांबले. तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्व मागण्या पूर्ण करू असं तिला आश्वासन दिलं. यावेळी या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या असं सांगितलं. या महिलेच्या या उद्गाराने भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला… बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांचे हातवारे, त्यांचा चढलेला आवाज आणि त्यांची बॉडी लँग्वेज पाहून सर्वच जण बुचकळ्यात पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा जाधव यांच्या वागण्याचीच चर्चा अधिक रंगली.

पाहा व्हिडीओ

भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे…

भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे… हीच ती लोकं जे तुम्हाला निवडून देतात… आणि ठरवलं तर घरी पण बसवतात… त्या महिलेची परिस्थिती काय? तुम्ही तिला बोलताय काय? सर्वसामान्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं नाही, बोलायचं नाही का? बरं कुणाचं ऐकायचं नव्हतं तर दौरे कशाला करताय?, असा सवाल पत्रकार शैलजा जोगळ यांनी केला आहे.

पूर येणारच नाही असं व्यवस्थापन करू

पाणी अचानक कसं भरलं. पूर का आला याचा आढावा घेण्यात आला आहे. पाणी, पूर तुम्हाला काही नवीन नाही हे मला कुणी तरी सांगितलं. यंदा पूर मोठ्याप्रमाणावर आला. कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे या पुराचं जलव्यवस्थापन करावं लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये तसं व्यवस्थापन करावं लागेल. पण त्याला थोडा अवधी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज द्या

यावेळी एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. पूर आला. त्यात आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर कर्ज आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला दोन टक्क्याने कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले.

पण मदत करा

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

संबंधित बातम्या:

साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

(CM Uddhav Thackeray folds hand in Chiplun Visit flood victims Bhaskar Jadhav requests him not to do)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.