VIDEO: काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. (cm uddhav thackeray)

VIDEO: काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, महिलेचा मुख्यमंत्र्यांकडे टाहो
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 1:59 PM

चिपळूण: तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, काहीही करा, आमदार, खासदारांचा पगार फिरवा, पण आम्हाला मदत करा, असा टाहोच या महिलेने फोडला. (cm uddhav thackeray reached at flood-hit chiplun)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

काहीही करा, पण मदत करा

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, असा टाहोही या महिलेने फोडला. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

होतं नव्हतं सर्व गेलं…

यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (cm uddhav thackeray reached at flood-hit chiplun)

संबंधित बातम्या:

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मृतदेह बाहेर काढणं महत्त्वाचं, राजकारण वा टीका करण्याची वेळ नाही: देवेंद्र फडणवीस

तळीयेतील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देणार; नारायण राणे यांची घोषणा

(cm uddhav thackeray reached at flood-hit chiplun)

सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.