AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखेंनी वापरलेला ‘लाचार’ शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं प्रत्युत्तर

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांमधील वाकयुद्ध काही केल्या थांबताना दिसत (Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat) नाही.

विखेंनी वापरलेला 'लाचार' शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं प्रत्युत्तर
| Updated on: Jun 20, 2020 | 12:13 AM
Share

अहमदनगर : भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांमधील वाकयुद्ध काही केल्या थांबताना दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विखे आणि थोरात यांनी एकमेकांवर वार-पलटवार केला आहे. (Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat)

“राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नाही. ते लाचारासारखे कसे सत्तेत सहभागी आहेत. याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे. प्रदेशाध्यक्षांना कुणी विचारत नाही,” अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी अप्रत्यक्षरित्या बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता केली.

यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी विखेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला लाचार शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

अनेक विरोधक देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मात्र महाविकासआघाडी सरकार भक्कम असून ते टिकेल, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर केला आहे. (Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat)

 संबंधित बातम्या : 

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस

शिवसेना खासदार अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती