Navneet Rana : नवनीत राणाच्या खारमधल्या घरी बीएमसीचं पथक दाखल, संपुर्ण इमारतीचं ऑडिट होणार

| Updated on: May 30, 2022 | 12:45 PM

नवनीत राणाच्या खारमधल्या घरी बीएमसीचं पथक दाखल, संपुर्ण इमारतीचं ऑडिट होणार

Navneet Rana : नवनीत राणाच्या खारमधल्या घरी बीएमसीचं पथक दाखल, संपुर्ण इमारतीचं ऑडिट होणार
नवनीत राणाच्या खारमधल्या घरी बीएमसीचं पथक दाखल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – बीएमसीकडून (BMC) नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी त्यांच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला होता. तसेच राणा दाम्पत्याकडून त्यावर लेखी उत्तर मागितलं होतं. नोटीस बजावल्यानंतरही उत्तर न मिळाल्याने बीएमसीचं पथक आज नवनीत राणाच्या खारमधल्या घरी दाखल झालं आहे. आज नवनीत राणा यांच्या घरासह संपुर्ण इमारतीचं ऑडिट होणार आहे. मुंबई महापालिकेची टीम या इमारतीचं ऑडिट करणार आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी हे ऑडिट होणार आहे. यापुर्वी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट केलं होतं. ते तात्काळ हटवावं नाहीतर महापालिका ते हटवेल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. आम्ही कसल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं नाही. तसेच विकासकाने बांधकाम केलं आहे असं नवनीत राणा यांनी मीडियाला सांगितलं होतं.

बीएमसी इमारतीतील सर्व फ्लॅटचे ऑडिट करणार आहेत

अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर बीएमसीने मोठी कारवाई करण्याची तयारी केली आहे. बीएमसीने खारमधील नवनीत राणा यांच्या इमारतीतील सर्व फ्लॅट मालकांना नोटीस बजावली आहे. बीएमसी इमारतीतील सर्व फ्लॅटचे ऑडिट करणार आहेत. याआधीही बीएमसीच्या टीमने राणा यांच्या खार येथील फ्लॅटला भेट देऊन त्यांच्या फ्लॅटवर काही बेकायदेशीर बांधकाम आहे का याची पाहणी केली होती. महाराष्ट्रात हनुमान चालिसाचा वाद सुरू झाल्यापासून खासदार नवनीत राणा सतत चर्चेत असतात. त्यांना अलीकडे जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. मंगळवारी संध्याकाळी फोन आल्याचे राणा यांनी सांगितले होते.

नवनीत राणा आणि शिवसेनेत वाद सुरू

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराच्याबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर आंदोलन केले. दुसरीकडे, महाराष्ट्र पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नवनीत राणा याच्यावर 153 (अ) चा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर केला. यानंतर नवनीत राणा यांनीही उद्धव सरकारवर जोरदार टीका केली.