AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Mangalvedha by election | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उडी, ‘हा’ उमेदवार मैदानात

ढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहूजन आघाडीनेसुद्धा आपला उमेदावार जाहीर केला आहे. (pandharpur mangalvedha by election)

Pandharpur Mangalvedha by election | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उडी, 'हा' उमेदवार मैदानात
VANCHIT BAHUJAN AGHADI
| Updated on: Mar 31, 2021 | 5:06 PM
Share

अकोला  : राष्ट्रवादीचे नेते भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तसेच माहाविकास आघाडीने महाविकास आघाडीनेसुद्धा आता वंचित बहूजन आघाडीनेसुद्धा आपला उमेदावार जाहीर केला आहे. वंचितकडून पंढपूर पोटनिवडणुकीसाठी विरप्पा मोटे (veerappa mote) यांच्या नावाची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakesh Ambedkar) यांनी केली. ही निवडणूक वंचित पूर्ण ताकदीने लढणार आहे. मोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज 30 मार्च रोजी दाखल केला.

व्हीबीए पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनांतर पंढरपूर-मंगळवेढा येथील विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाने सविस्तर कार्यक्रम पत्रिकासुद्धा जाहीर केलीये. त्यानंतर ही जागा खिशात घालण्यासाठी राज्यातील मोठ्या पक्षांनी जोरदार तयारी केलीये. भाजपने समाधान आवताडे यांनी संधी दिली असून राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे येथील निवडणूक अतिशय अटितटीची होणार असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत आता वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा उडी घेतली आहे. वंचितकडून विरप्पा मोटे यांना तिकीट देण्यात आले असून त्यांच्या नावाची घोषणा घोषणा खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात केली. पंढरपूर येथील जागा वंचित पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचेही यावेळी वंचितने सांगितले. मोटे यांनी काल ( 30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना महिला जिल्हाप्रमुखाची बंडखोरी

तत्पूर्वी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Pandharpur Assembly By-Election) जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे (Shaila Godse) यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलेलाय. यावेळी बोलताना बंडखोरी करुन अर्ज भरल्यामुळे शिवसेना पक्षाने कारवाई केली तरी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचे गोडसे यांना सांगितले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक  

> 17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021

> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021

> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021

> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021

> मतदान – 17 एप्रिल 2021

> निवडणूक निकाल – 2 मे 2021

इतर  बातम्या :

Param Bir Singh Anil Deshmukh Live Updates | गृहमंत्री असो की मुख्यमंत्र्यांचा सहभाग असो सीआपीसीच्या तरतुदी बाजूला ठेवता येणार नाहीत: हायकोर्ट

SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार

LIVE | वंचित बहुजन आघाडीची पंढपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उडी, ‘हा’ उमेदवार मैदानात

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...