AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज, लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम

महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी किसान पोर्टलवरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवले (candy crush message link on farmer mobile) आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज, लिंक ओपन केल्यावर कँडीक्रश गेम
| Updated on: Jan 18, 2020 | 11:31 PM
Share

उस्मानाबाद : महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी किसान पोर्टलवरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवले (candy crush message link on farmer mobile) आहेत. यात लिंकही देण्यात आली आहे. मात्र ती लिंक ओपन केल्यानंतर त्यावर कँडीक्रशसह अन्य गेमच्या वेबसाईट ओपन होत आहे. अगोदरच कर्जमाफीची प्रतिक्षा असताना असा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

फडणवीस आणि ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अशा दोन वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या. मात्र प्रशासकीय व तांत्रिक त्रुटीमुळे अनेक शेतकरी आजही कर्जमाफीपासून वंचित आहेत. अशातच सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देणारा एक मेसेज VZ- KISSAN या एस.एम.एस पोर्टलवरून शेतकऱ्यांना पाठवला आहे. या मॅसेजमध्ये “महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या माहितीसाठी https://bit.do/mjpsky 2019 या लिंक ला भेट द्या,” असे लिहिले (candy crush message link on farmer mobile) आहे.

मात्र https://bit.do/mjpsky 2019 या लिंकवर माहितीऐवजी चक्क गेम अपलोड करण्यात आले आहेत. या योजनेची माहिती देण्यासाठी शासनाने ही साईट तयार केली आहे. यावर कुठलीही माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे ही लिंक ओपन केल्यानंतर कॅन्डी क्रश सागा, डायमन डायरीज असे गेम ओपन होत आहेत. शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका करत आहेत.

सततची नापिकी, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच त्रस्त आहेत. तसेच सरकारने दिलेली अनुदानरुपी मदत, पि. एम किसानचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडलेला आहे. मात्र आता या आलेल्या मॅसेजमुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चांगलेच नाराजीचे वातावरण आहे. कर्जमाफीच्या एसएमएसच्या या प्रकाराकडे सरकारसह प्रशासनाचे दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे सरकारने डोळे उघडण्याची गरज (candy crush message link on farmer mobile) आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...