AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’, चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, बावनकुळे पक्षाचा प्रत्येक कार्यक्रमात जोमाने काम करत राहिले. अनेक आंदोलनांचं नेतृत्वही बावनकुळेंनी केलं. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पक्षाचे आभार मानले, तसंच पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

'पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार', चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 20, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या 5 जागांसाठी काल भाजपनं उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, बावनकुळे पक्षाचा प्रत्येक कार्यक्रमात जोमाने काम करत राहिले. अनेक आंदोलनांचं नेतृत्वही बावनकुळेंनी केलं. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना पक्षाचे आभार मानले, तसंच पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केलाय. (Chandrashekhar Bavankule’s first reaction after getting ticket from BJP for Legislative Council elections)

बावनकुळे म्हणाले की, पक्ष श्रेष्ठीने पुन्हा विश्वास टाकला आहे. सर्वांचे आभार मानतो. मी बाहेर होतो पण पक्षाचे काम करत होतो. माझं तिकीट कापलं तेव्हा मी नाराज नव्हतो. पक्षाचं काम करत राहिलो. आता पक्षाला वाटलं तेव्हा मला पुन्हा संधी दिली आहे. आमच्या पक्षात ओबीसी किंवा जात बघून उमेदवारी दिली जात नाही. मला तिकीट दिलं नव्हतं म्हणून भाजपला विधानसभेत फटका बसला असं म्हणता येणार नाही. त्याचं कारणं वेगळी आहेत. आता पुन्हा विधिमंडळात जोमाने काम करेन, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.

विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी

कोल्हापूर : अमल महाडिक

धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे

अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल

मुंबई : राजहंस सिंह

बावनकुळेंच्या नेतृत्वात भाजपची अनेक आंदोलनं

विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही मोठे चेहरे डावलण्यात आले होते. त्यात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही पत्ता कट झाला होता. त्यानंतर बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, बावनकुळे सातत्याने पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय राहिले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन, अशा अनेक आंदोलनात बावनकुळेंनी यशस्वी नेतृत्व केलं. पक्षासाठी काम करत राहिल्याचं फळ आता बावनुकळेंना मिळालं आहे. त्यांना नागपूर विधान परिषदेसाठी पक्षाकडूनस संधी देण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची राजकीय कारकीर्द

>> 13 जानेवारी 1969 रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म

>> खसाळा, ता. कामठी येथे जन्म, बीएसटी फर्स्ट इयर पर्यंत शिक्षण

>> 1990 पासून कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी संघर्ष

>> 1990 साली ‘छत्रपती सेना’ स्थापना

>> 1995 मध्ये भाजपमध्ये प्रवेश

>> 1997 मध्ये कोराडी क्षेत्रातून भाजप चर्फे जिल्हा परिषद निवडणूकीत विजय

>> भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष

>> 2004 मध्ये कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार

>> चार वेळा कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार

>> 2019 ला ऊर्जा मंत्रीराज्य उत्पादन शुल्क मंत्री

>> सध्या भाजप प्रदेश सरचीटणीस

कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक सामना

भाजपकडून अमल महाडिक यांचं नाव निश्चित झालं आहे. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून कोण उमेदवार असेल यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर अमल महाडिक यांचं नाव भाजपनं निश्चित केलं आहे. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. अमल महाडिक यांनी त्यावेळी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

इतर बातम्या : 

Maharashtra Vidhan Parishad | विधानपरिषद निवडणुकीत भाजपची भिस्त आयारामांवर, पाचपैकी तिघे उमेदवार मूळ काँग्रेसचे

रत्नागिरी: 86 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन; तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

Chandrashekhar Bavankule’s first reaction after getting ticket from BJP for Legislative Council elections

Follow Us
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात