Eknath Shinde | शिंदे-फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ विस्तार कधी? मुख्यमंत्र्यांचं उत्तर वाचा!

| Updated on: Jul 09, 2022 | 3:41 PM

राज्यातील कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळणार, याकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय. पण ही प्रक्रिया कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

Eknath Shinde | शिंदे-फडणवीस दिल्लीत, मंत्रिमंडळ विस्तार कधी? मुख्यमंत्र्यांचं उत्तर वाचा!
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्लीः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम जनतेला आता मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra cabinet) आस लागली आहे. भाजप आणि शिंदे (Eknath Shinde) गटातील प्रमुख आमदारांमध्ये वारंवार बैठका होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नुकतेच दिल्लीत गेले आहेत. महाराष्ट्रातील खातेवाटपावर दिल्लीतील भाजप श्रेष्ठींसमोर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल हे दोघेही दिल्ली पोहोचले. आज शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्ली भेटीचा नेमका काय अजेंडा आहे, हे पत्रकारांसमोर स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचंही उत्तर दिलं.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

राज्यातील कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळणार, याकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय. पण ही प्रक्रिया कधी होणार, या प्रश्नाचं उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ दिल्लीतील आजची अमित शहा, नरेंद्र मोदी यांची भेट सदिच्छा भेट आहे. उद्या आषाढी झाली तर मुंबईत भेटून यावर चर्चा करू. 18 तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या मागे पुढे खातेवाटप होऊ शकते. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्र्यांचा शपथ होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

घडामोडींची जगाने दखल घेतलीय..

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराची जगाने दखल घेतली आहे. यात फडणवीसांचं योगदान मोठं आहे. हे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ देशात आणि राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. किंबहुना जगाने दखल घेतली आहे. पण आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे. आमचा एक प्लसपॉइंट आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार हे प्रकल्प आम्ही पुढे नेणार आहोत. राज्याला गतवैभव आणून देऊ. कारण हे प्रकल्प मधल्या काळात रखडली होती. हे सामान्य लोकांचे प्रकल्प आहेत.

महाराष्ट्राचे तुकडे होणार?

भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, असा आरोप शिवसेनेकडून होतोय. यावर प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महाराष्ट्राचे तुकडे हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पण राज्यातील जनता सूज्ञ आहे. कोणी काही बोलो. आम्ही त्यावर बोलणार नाही. आम्ही आमचं काम करू…