Cm Eknath Shinde Video : काय सांगता..? मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवून फोन लावला? नेटकरी म्हणतात फेकायला…!

आता मुख्यमंत्र्यांचा मालेगावच्या सभेतला एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय आणि तो व्हिडिओ ऐकल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला की खरंच मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवले होते काय? तो व्हिडिओही पाहा...

Cm Eknath Shinde Video : काय सांगता..? मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवून फोन लावला? नेटकरी म्हणतात फेकायला...!
मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवून फोन लावला? नेटकरी म्हणतात फेकायला ...Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 8:10 PM

मालेगाव : गेल्या एक महिन्यापासून राज्यात एकच नेता चर्चेत आहे, ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पत्त्याच्या डावासारखा कोसळायला भाग पाडलं. त्यानंतर 50 आमदारासह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर सर्वांनाच सरप्राईज करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती ही एकनाथ शिंदे हेच विराजमान झाले. मुख्यमंत्रीपदाचे सूत्रं हाती हेतल्यानंतही  त्यांनी राज्यात निर्णयांचा धडाका लावला. अधिकाऱ्यांना फोनवरती, फोन जाऊ लागले. मुख्यमंत्र्यांचे त्याचे अनेक व्हिडिओही चर्चेत आले. कुणाला रुग्णालयात फोन लावल्याचे  व्हिडिओ (Cm Eknath Shinde Video Call) बाहेर आले, तर कुठे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करताना मुख्यमंत्री दिसून आले. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा मालेगावच्या सभेतला एक व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आलाय आणि तो व्हिडिओ ऐकल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला की खरंच मुख्यमंत्र्यांनी हवेत विमान थांबवले होते काय? तो व्हिडिओही पाहा…

मुख्यमंत्र्यांचा तो किस्सा चर्चेत

व्हिडिओ मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात?

हा व्हिडिओ नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत मी विमानात बसलो होतो. ते कुठेतरी निघाले होते, मात्र त्यांना रुग्णालयात फोन लावायचा होता. डॉक्टरला फोन लागत नव्हता. त्यावेळेस मी पायलटला सांगितलं, पाच मिनिटात थांब मला डॉक्टरला फोन लावू द्या, त्यानंतर फोन लावला. एखाद्या रुग्णाला वाचवण्यासाठी फोन लावला गेला पाहिजे, निर्णय झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये सांगताना दिसून येतात, एवढाच किस्सा त्यांनी सांगितला आहे. मात्र हे विमान जमिनीवर होतं किंवा हवेत असे काही सांगितलं नाही, मात्र नेटकऱ्यांनी याबाबत आपल्या परीने अंदाज लावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

त्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांचा या सभेतला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला आहे. त्यावरती कमेंट ही तशाच भन्नाट यायला लागलेलेल्या आहेत. या वरती नेटकरी सवाल विचारतात की मुख्यमंत्र्यांनी विमान हवेत थांबवलं होतं काय? त्यानंतर काही नेटकरी तर यावरती कमेंट अशा करत आहेत की “फेकायला सर्वांना मागे टाकलं, भाजपच्या गोटात सन्नाट” आहे अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट सोशल मीडियावर दोन्ही बाजूने येत आहेत. आता या कॉल मागचं सत्य काय आणि कुठून मुख्यमंत्र्यांनी कॉल लावला आहे? हे तर मुख्यमंत्रीच सांगतील. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने वायरल होतोय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.