AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. (uddhav thackeray addressing maharashtra people)

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले
| Updated on: Nov 22, 2020 | 9:08 PM
Share

मुंबई: अनलॉकच्या मुद्दयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. (uddhav thackeray addressing maharashtra people)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याने ते काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून राज्यातील जनतेवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. तसेच मिशन बिगीन अगेनच्या अनुषंगाने कोणतीही नवी घोषणा केली नाही. मात्र, अनलॉकची मागणी करणाऱ्या विरोधकांना त्यांनी खडेबोल सुनावले.

बाकीच्यांचं ठिक आहे. मला यात राजकारण आणायचं नाही. हे उघडा ते उघडा म्हणता… उघडतो. सगळं उघडतो. जबाबदारी घेता का? असा सवाल करतानाच राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी जबाबादारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. योग्यवेळी एकाएका गोष्टीतून तुमची सुटका करणार असल्याचं मी सांगितलं होतं. त्यानुसार धार्मिकस्थळं उघडी करण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. ते योग्य नाही. तुम्ही गर्दी करू नका. कोरोनाचं संकट संपलेलं नाही. याचं भान ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं. (uddhav thackeray addressing maharashtra people)

कोरोनाचं संकट टळलेलं नाही, सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहेत. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray | कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(uddhav thackeray addressing maharashtra people)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...