Rahul Gandhi: राहुल गांधींनी शेअर केला शिव-पार्वतीचा फोटो, CM हेमंत बिस्वा भडकले!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावरुन त्यांच्यावर चौफेर टीका झाली. सोनिया गांधी आणि पिता राजीव गांधी यांच्यामधील प्रेमाचं नाते व्यक्त करताना राहुल गांधी यांनी हे विधान केले होते. या विधानावरुन ट्रोल झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Rahul Gandhi News: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावरुन त्यांच्यावर चौफेर टीका झाली. सोनिया गांधी आणि पिता राजीव गांधी यांच्यामधील प्रेमाचं नाते व्यक्त करताना राहुल गांधी यांनी हे विधान केले होते. या विधानावरुन ट्रोल झाल्यानंतर आता राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणालेत राहुल गांधी?
“सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) समर्थकांच्या मनात भीती, राग आणि द्वेषाचे जाळे विणले गेले आहे, जे त्यांना प्रेम अनुभवण्यापासून आणि व्यक्त करण्यापासून रोखत आहे. एक “खरा हिंदू” म्हणून या लोकांना या जाळ्यातून मुक्त करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, जेणेकरून ते देखील त्यांच्या जीवनात प्रेम आणि आपलेपणाचे सौंदर्य आणि आनंद अनुभवू शकतील,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. सोबतच त्यांनी शिव-पार्वतीच्या मुर्तीचा सुंदर फोटोही पोस्ट केला आहे.
कोणत्या विधानावरुन झाले होते ट्रोल?
अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या औपचारिक प्रकाशनप्रसंगी, राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यातील प्रेमाचा उल्लेख करताना म्हटले होते की, “आम्ही जेवताना प्रत्येक वेळी मम्मा बाबांच्या मांडीवर बसायची. मला वाटले की हे सामान्य आहे.” राहुलने आपल्या आई-वडिलांमधील प्रेमाबद्दल सांगताना म्हटले की, त्याच्या लहानपणी त्याची आई सोनिया गांधी अनेकदा वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर बसून जेवण करत असे. त्याला हे सामान्य वाटत असे आणि तो मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्या आया वडिलांच्या मांडीवर का बसत नाहीत,” असे विचारायचा.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली
दरम्यान, यावरुन आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुलच्या वक्तव्यावर टीका केली आणि त्याची खिल्ली उडवली. हिमंता बिस्वा सरमा यांनी लिहिले, “सॉरी मॅडम, तुमच्या आयुष्यातील इतक्या खास प्रसंगीही तो तुम्हाला लाजिरवाणे करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. देशाला हे खूप पूर्वीच समजले आहे. आशा आहे की, तुम्हालाही आता ते दिसेल. हे आता उत्पादन लॉन्च आणि री-लॉन्चच्या खूप पुढे गेले आहे., असं ते म्हणाले होते.
नव्या पोस्टवरही बिस्वा यांची टीका!
दरम्यान, हेमंत बिस्वा यांनी राहुल गांधी यांच्या नव्या पोस्टवरुनही निशाणा साधला आहे. “जेव्हा एखादी व्यक्ती देवापुढे नतमस्तक होण्याऐवजी स्वतःलाच देव मानू लागते, तेव्हा तिच्या पतनाची सुरुवात वेगाने होते. सामान्य माणसांना शिव आणि पार्वती म्हणून चित्रित करणे ही भक्ती नाही. हा अहंकार इतका वाढलेला असतो की, ती व्यक्ती स्वतःलाच दैवी समजू लागते. कोणताही गांधी, किंवा खरं तर कोणताही माणूस, कधीही देव होऊ शकत नाही. आपण आपल्या देवापुढे नतमस्तक होतो. आपण स्वतःला त्याच्या समान मानत नाही. नम्रता हा महानतेचा पाया आहे. जेव्हा अहंकार त्याचे स्थान घेतो, तेव्हा पतनाची सुरुवात आधीच झालेली असते,” अशी टीका त्यांनी केली आहे.