AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष होण्याचं जवळपास निश्चित, CWC बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेला वाद लवकरच मिटणार असल्याची शक्यता (Rahul Gandhi will Become Congress President Sources) आहे.

राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष होण्याचं जवळपास निश्चित, CWC बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं
| Updated on: Aug 24, 2020 | 1:41 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेला वाद लवकरच मिटणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे माहिती मिळत आहे. याबाबत लवकरच राहुल गांधी  स्वत: घोषणा करणार आहे, असेही सांगितले जात आहे. (Rahul Gandhi will Become Congress President Sources)

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु होत आहे. ही बैठक सुरु झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी आपला राजीनाम्याचा प्रस्ताव दिला.

त्यावेळी सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती या बैठकीदरम्यान करण्यात आली. राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी आपण अध्यक्ष व्हा, अशी विनंती केली. राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारावं अशी विनंती काँग्रेस शासित राज्याच्या सर्व मुख्यमंत्री यांनी केली आहे.

सोनिया गांधीची कार्यसमिती पुढे राजीनाम्याची ऑफर दिली. तसेच कार्यकारिणीने नवा अध्यक्ष निवडा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच त्या 23 पत्रलेखक नेत्यांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी नाराजी व्यक्त केली.

मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी बैठकीतून केली. पत्र लिहिण्यासाठी हीच वेळ का निवडली, असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थितीत  केला. या 23 पत्रलेखक नेत्यांवर CWC च्या नेत्यांची टीका केली. या नेत्यांना उत्तर मागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वादावादी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणी अर्थात CWC बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावं यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आग्रही आहेत.

काँग्रेसच्या 23 नेत्यांचं पत्र 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे.पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.

पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनील केदार

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असं ट्विट राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केलं.

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनियांकडे अध्यक्षपद

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. (Rahul Gandhi will Become Congress President Sources)

संबंधित बातम्या :

अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!