मंत्री मंडळ विस्तार होईल तेव्हा आमचं खातं त्यांना देऊ किंवा त्यांच खातं आम्ही घेऊ; खातेवाटप झाल्यानंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जेव्हा मंत्री मंडळ विस्तार होईल तेव्हा समजा त्यांना वाटलं आमच्याकडे खातो त्यांना हवय तर आम्ही देऊ किंवा आम्हाला वाटलं त्यांच्याकडे खाता आम्हाला तर ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. आमच्यात कुठलाही खात्याच्या संदर्भात वाद नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्री मंडळ विस्तार होईल तेव्हा आमचं खातं त्यांना देऊ किंवा त्यांच खातं आम्ही घेऊ; खातेवाटप झाल्यानंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
गृह आणि अर्थ खाती फडणवीसांकडेच? भाजप पु्न्हा निर्णयांचा धक्का देण्याच्या तयारीत? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 5:58 PM

मुंबई : मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो त्यानुसार त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केलेला आहे. त्यांच्या नेतृत्वात जेवढे आम्ही सगळे मंत्री आहोत माझ्यासहित आम्ही सर्व जण मिळालेल्या  खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू.  आता आमचे मंत्रीमंडळ अर्ध्यापेक्षा थोडं कमीच आहे त्यामुळे काही जास्त भार आमच्या सगळ्यांवर आहे पण त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले. खाते वाटपानंतर( cabinet allocation) देवेेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, कोणतं खातं मिळालं हे महत्त्वाचे नाही तसेच आमच्यामध्ये खात्यांवरुन कोणाताही वाद नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खाते वाटपावरुन आमच्यात कोणतेही मतभेद अथवा वाद नाहीत

खाते वाटपावरुन आमच्यात कोणतेही मतभेद अथवा वाद नाहीत. जेव्हा मंत्री मंडळ विस्तार होईल तेव्हा समजा त्यांना वाटलं आमच्याकडे खातो त्यांना हवय तर आम्ही देऊ किंवा आम्हाला वाटलं त्यांच्याकडे खाता आम्हाला तर ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. आमच्यात कुठलाही खात्याच्या संदर्भात वाद नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. संबधीत खातं चालवणारे योग्य व्यक्ती असेल पाहिजेत तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आता तरी साधारणपणे त्यांच्याकडची जी खात्यात विस्तारामध्ये यात बदल होवू शकतो.

आमच्याकडची खाती विस्तारामध्ये आमच्या लोकांना मिळतील. काही चेंज करायची गरज पडली तर आम्ही बसून करू शकू.  विस्तार कधी करायचा याबाबत मुख्यमंत्री एकनात शिंदेसह चर्चा करुन निर्णय घेऊ.

अडीच वर्षाचा फॉर्मुला कधीही नव्हता

माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले मला माहित नाही पण त्यांच्या मनात पूर्ण सत्य आहे. अडीच वर्षाचा फॉर्मुला कधीही नव्हता. मी पहिल्या दिवशी पासून सांगतोय कारण मी स्वतः साक्षीदार आहे. सगळ्या वाटाघाटी मी स्वतः केल्या होत्या. त्याच्यामुळे कधीही अडीच वर्षाचा फॉर्मुला नव्हता तर आता झालं ते आता निघून गेलं जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी केले.

बेईमानी तर आमच्या सोबत झाली होती

अक्षरशः मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस ते  आम्हाला बेइमान म्हणतात. सगळ्यात मोठी बेईमानी तर आमच्या सोबत झाली होती. आमच्या सोबत जे निवडून आले त्यांनी आम्हाला सोडून विरोधकांशी हात केली आणि सरकार स्थापन केले.  यापेक्षा अजून काय विश्वासघात असू शकतो असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.