VIDEO : एकाच व्यासपीठावर शेजारी बसले, ना एकमेकांकडे पाहिलं, ना बोलले, भाषणाची वेळ येताच जोरदार टोलेबाजी!

| Updated on: Aug 31, 2021 | 3:56 PM

राज्याच्या राजकारणात मुंडे बंधू भगिनीचे नाव अग्रस्थानी आहे. मात्र दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने, अनेकदा मुंडे बंधू-भगिनी मधील मतभेद समोर आल्याचं दिसून आले होते. काल मात्र परळीच्या एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

VIDEO : एकाच व्यासपीठावर शेजारी बसले, ना एकमेकांकडे पाहिलं, ना बोलले, भाषणाची वेळ येताच जोरदार टोलेबाजी!
Dhananjay Munde_Pritam Munde
Follow us on

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) काल एकाच व्यासपीठावर आले. परळीत (Parli) मुंडे बंधू भगिनी एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी दोघांची भाषणातून जुगलबंदी पाहायला मिळाली.

राज्याच्या राजकारणात मुंडे बंधू भगिनीचे नाव अग्रस्थानी आहे. मात्र दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने, अनेकदा मुंडे बंधू-भगिनी मधील मतभेद समोर आल्याचं दिसून आले होते. काल मात्र परळीच्या एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

परळी शहरात स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघांचीही नावं होती. त्यामुळे हे तिघेही जण एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील अशी चर्चा होती.

दोघेही एकाच मंचावर, पण संवाद नाही

परंतु भाजप नेत्या पंकजा मुंडे परळीत नसल्यानं त्या या कार्यक्रमास येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी यावेळी हजेरी लावली, या दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे शेजारी बसले असले तरी, या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. परंतु या प्रसंगाने चांगलीच चर्चा घडवून आणली.

Dhananjay Munde_Pritam Munde

जुगलबंदी

दरम्यान या कार्यक्रमात दोघा मुंडे बंधू-भगिनीची भाषणातून चांगलीच जुगलबंदी दिसून आली. प्रीतम मुंडे यांना या कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाला. त्यावेळी परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था सांगत खासदार मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या शहरात संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल टीका केली. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील खासदार प्रीतम मुंडे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. परळीचा पायाभूत विकास सुरु आहे, त्यामुळे आमच्या ताईला इथे पोहोचण्यास उशीर झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले.

VIDEO : प्रीतम मुंडे यांचं भाषण

VIDEO : धनंजय मुंडे यांचं भाषण