AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाऊ.. भाऊ.. काय नाचायलाय धनुभाऊ!’ Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘सुपर से भी उपर!’

Dhananjay Munde Dance Video : लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय.

'भाऊ.. भाऊ.. काय नाचायलाय धनुभाऊ!' Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'सुपर से भी उपर!'
धनंजय मुंडेंचा व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 10:57 PM
Share

लातूर : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना प्रेमानं त्यांचे कार्यकर्ते धनुभाऊ म्हणतात. याच धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. लग्नात नवरा नवरीसोबत वरातीत धनुभाऊ थिरकले. यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केलाय. धनुभाऊंनी या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून बेभान होऊन धनंजय मुंडे लग्नाच्या वरातीचा आनंद घेताना दिसले आहेत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्नाच्या वरातीत उत्साहानं नाचणारा एक जण असतोच. या लग्ना ती व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडेच होती की काय, असा प्रश्न तुम्हाला त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video of Dhananjay Munde) पाहून होऊ शकतो. आपल्या नेहमीच्या शालीन, शांत अशा स्वभावाला एकदम छेद देत धनुभाऊंनी केलेला डान्स पाहून त्यांचे चाहत्यांना त्यांना ‘सुपर से उपर’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ओह्ह.. ग्रेट.. व्हाऊ!

धनंजय मुंडे यांनी या लग्नात ज्या वेशात ठेका धरला, तेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारंच होतं. साध्या सफेद रंगाच्या ट्रॅक स्वेट जॅकेटवर धनंजय मुंडे निळी ट्रॅक पॅन्ड परिधान केलेल्या धनंजय मुंडेनी या लग्नाच्या डिजेमध्ये आपल्या स्पेशल परफॉर्मन्स दिलाय. डॉन गाण्यावर धनंजय मुंडे यावेळी थिरकताना दिसलेत. अरे दिवानो.. मुझे पेहचानो, कहाँ से आया मे हू डॉन या गाण्याच्या रिमिक्स वर्जनवर धनंजय मुंडे बेभान होऊन नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये कैद झालंय.

धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या नात्यातला विवाह असल्यानं धनंजय मुंडे सकाळपासूनच या लग्नाला हजर होते. तर दुपारच्या सुमारात पंकजा मुंडेही या लग्नाला उपस्थित झाल्या होत्या. दरम्यान, लग्नाच्या वरातीत मात्र धनंज मुंडे यांनी दिवसभराचा लग्नाचा सगळा क्षीण बाहेर काढल्याची चर्चा रंगली आहे.

बहीण-भावाची टाळी

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाची तेजश्री वामनराव केंद्रे यांच्या विवाहानिमित्त उपस्थित राहिले होते. दोघांनीही नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिला. एवढंच नाही तर विवाहस्थळी दोघाही बहीण भावांनी एकमेकांच्या हाताला जोरदार टाळी दिली.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाचीच्या लग्नाला हजेरी, मनमुराद गप्पा, कौंटुबिक वातावरणात सोहळा संपन्न

Special Report | बीडमध्ये खुद्द आमदार संदीप क्षीरसागर यांना झाडावर का चढावं लागलं?

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.