AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंचा सहावीपासून फॅन, लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी 174 किलोंचा हार

बीडच्या कार्यकर्त्याने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी चक्क नेत्याच्या वजनाच्या दुपटीचा हार घालून भव्य स्वागत (dhananjay munde felicitation beed) केलं.

धनंजय मुंडेंचा सहावीपासून फॅन, लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी 174 किलोंचा हार
| Updated on: Jan 10, 2020 | 9:52 PM
Share

बीड : आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी कोण काय करेल याचा काही नेम (dhananjay munde felicitation beed)  नाही. असाच एका बीडच्या कार्यकर्त्याने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी चक्क नेत्याच्या वजनाच्या दुपटीचा हार घालून भव्य स्वागत केलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. नेत्यावर निष्ठा ठेवत एका कार्यकर्त्यांने धनंजय मुंडे यांच्या वजनाच्या दुप्पट इतकं हार तयार करुन त्यांचा अनोखा स्वागत केलं.

धनंजय मुंडे हे काल (9 जानेवारी) भगवान गडावर पहिल्यांदाच मंत्री म्हणून दर्शनासाठी गेले होते. याचे औचित्य साधून सौरभ आघाव या कार्यकर्त्याने आपल्या मित्रासोबत तब्बल 174 किलोचा हार बनवला. याच हारातून साहेबांचं अनोखं स्वागत करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सौरभ हा सहावीत असल्यापासून धनंजय मुंडे यांचा फॅन आहे. आपला आवडता नेता मंत्री झाल्याने आनंद द्विगुणीत करण्यासाठी सौरभने त्याच्या मित्राला सोबत घेऊन तब्बल 174 किलोचा हार बनवला.

एवढा मोठा वजनाचा हार बनवण्यासाठी सौरभने शेख सलीमची मदत घेतली. या फूलवाल्याची शेख सलीम गेल्या 40 वर्षांपासून फुलांचा व्यवसाय करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांच्याकडे तब्बल 144 किलोचा हार तयार करण्याची मागणी आली आहे. ही फूल अहमदनगर मागवण्यात आले आहेत. या एवढा मोठा हार बनवण्यासाठी तब्बल 9 ते 10 तास सलीम यांनी घातले.

महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय व विशेष न्याय मंत्रिपद मिळाले. बीडचे पालकमंत्री असं परत मिळाला आहे. धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच मंत्री होऊन बीड जिल्ह्यात परतल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि चाहते रस्त्यावर उतरले. मात्र सौरभने केलेल्या अनोख्या स्वागताची चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात लक्ष वेधून (dhananjay munde felicitation beed)  घेतले.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ