प्रोटोकॉल तोडून धनंजय मुंडे मध्यरात्रीच बेळगावात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

बेळगाव : कर्नाटकातील सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बेळगावात दाखल झाले आहेत. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे हे […]

प्रोटोकॉल तोडून धनंजय मुंडे मध्यरात्रीच बेळगावात
Follow us on

बेळगाव : कर्नाटकातील सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बेळगावात दाखल झाले आहेत. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

कर्नाटक सरकारच्या बंदीला झुगारुन धनंजय मुंडे बेळगावात दाखल झाले आहेत, ते सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. धनंजय मुंडेंनी पोलीस बंदोबस्त नसतानाही या मेळ्यात हजर राहण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते रविवारी संध्याकाळीच कोल्हापुरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, “कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसने कायम पाठिंबा दर्शविला आहे. बेळगावचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने दीर्घ काळापासून लढा दिला आहे. हा लढा पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येईल. तसेच मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येईल”, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे हे मध्यरात्री बेळगावात दाखल झाले, त्यानंतर ते एका अज्ञातस्थळी मुक्कामी थांबले. तसेच बेळगावात जाताना त्यांनी रस्त्यात गाड्याही बदलल्या. बेळगावात ते मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला संबोधित करणार आहेत.