AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | राजकीय वैर संपवत केक भरवला, मनिष जैन-एकनाथ खडसेंचे प्रेमाचे पर्व

माजी आमदार मनीष जैन यांना वाढदिवसानिमित्त दिग्गज नेते एकनाथ खडसेंनी केक भरवला. (Eknath Khadse Manish Jain)

VIDEO | राजकीय वैर संपवत केक भरवला, मनिष जैन-एकनाथ खडसेंचे प्रेमाचे पर्व
माजी आमदार मनिष जैन यांना एकनाथ खडसेंनी केक भरवला
| Updated on: Feb 04, 2021 | 10:21 AM
Share

जळगाव : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राजकीय वैर विसरुन माजी आमदाराला केक भरवला. राष्ट्रवादीचे माजी आमदार मनिष जैन (Manish Jain) यांना वाढदिवसानिमित्त केक भरवून खडसेंनी प्रेमाचे नवे पर्व सुरु केले. (Eknath Khadse offers Cake to Former MLA Manish Jain)

माजी आमदार मनिष जैन आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे वैर हे सर्वश्रुत आहे. परंतु खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दोघांनी प्रेमाचं नवीन पर्व सुरु केलं. मनीष जैन यांना वाढदिवसानिमित्त खडसेंनी केक भरवला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संवाद यात्रेनिमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष उपस्थित होते.

खडसेंच्या सूनेकडून मनीष जैन पराभूत

एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात लोकसभा निवडणूक जिंकली होती. रक्षा खडसेंनी मनीष जैन यांचा चार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता.

“महाविकास आघाडी सरकार टिकणार”

“राज्याचं राजकारण बदलत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आता पाय रोवत आहे. समोरच्यांना कितीही वाटत असेल, हे सरकार पडणार आहे, हे सरकार जाणार आहे, तरी हे सरकार टिकणार आहे, सरकार चालणार आहे.” असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse offers Cake to Former MLA Manish Jain)

“यांना मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल

“कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये, म्हणून काही गोष्ट कराव्या लागतात. कार्यकर्ते थांबवून ठेवण्यासाठी, अरे बाबा सरकार येणार आहे जाऊ नकोस, तुला महामंडळ देणार आहे, तुला समिती देणार आहे, हे सरकार पडणार आहे, असं सांगण्याचा प्रयत्न कार्यकर्ते थोपवून धरण्यासाठी वारंवार केला जातो. आता वर्ष उलटलं, अशीच पाच वर्ष निघून जातील आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागेल.” असं खडसे म्हणताच कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये खसखस पिकली.

संबंधित बातम्या:

भाजप खासदार सूनबाईंकडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच’ करत बसावं लागणार, खडसेंचा फडणवीसांना टोला

(Eknath Khadse offers Cake to Former MLA Manish Jain)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.