भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

जळगाव: राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (eknath khadse grand welcome in jalgaon after joining ncp)

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे काल जळगावात पोहोचले. त्यानंतर ते आज पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मूळगावी कोथळीत पोहोचले. यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नाथाभाऊ जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. त्यानंतर नाथाभाऊंना गुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच रिघ लागली. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत करत खडसे यांनी त्यांच्या घराकडे मार्गक्रमण केलं. दारात येताच रक्षा खडसे आणि मंदाकिनी खडसे यांनी खडसे यांचं औक्षण करत त्यांचं घरात स्वागत केलं. खडसे यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर खडसेंच्या निवासस्थानी असून त्यांची चर्चा सुरू आहे.

काहीवेळ कोथळीत थांबल्यानंतर एकनाथ खडसे हे मुक्ताई नगरमधील त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. तिथे गेल्यावर ते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. पुढील वाटचालीबद्दल ते या सर्वांशी हितगूज साधणार आहेत. (eknath khadse grand welcome in jalgaon after joining ncp)

संबंधित बातम्या:

बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यावर चौकशा लावल्या : एकनाथ खडसे

मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार, खडसेंचं फडणवीसांकडे बोट

(eknath khadse grand welcome in jalgaon after joining ncp)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *