शिंदे विरुद्ध ठाकरे, सत्तासंघर्षाची सुनावणी 27 सप्टेंबरला, दसरा मेळाव्याआधीच…?

| Updated on: Sep 24, 2022 | 5:39 PM

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या खटल्यासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. 27 तारखेच्या सुनावणीत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल लागण्याची शक्यता आहे, हा निकाल शिंदेंच्या विरोधात लागण्याची शक्यता घटनातज्ज्ञ बापट यांनी वर्तवली आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे, सत्तासंघर्षाची सुनावणी 27 सप्टेंबरला, दसरा मेळाव्याआधीच...?
Image Credit source: social media
Follow us on

संदीप राजघोळकर, नवी दिल्लीः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे.. .शिवसेनेतील दोन नेत्यांमधील आणि एकूणच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील वादावर येत्या 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra politics) नाट्यावरील सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. 27 तारखेच्या कोर्टाच्या कामकाजात या खटल्याचा समावेश असल्याची माहिती टीव्ही 9 च्या सूत्रांनी दिली आहे. सुनिल प्रभू विरुद्ध राज्यपाल या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे (Supreme court) मुख्य न्यायाधीश उदय लळित यांच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याआधीच राज्यातील सत्तासंघर्षावर मोठा निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दसरा मेळाव्याआधीच?

सुप्रीम कोर्टातील शिंदे विरुद्ध ठाकरे या सत्तासंघर्षाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र मुंबई हायकोर्टात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा, या खटल्याचा निकाल नुकताच लागला. यात उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला.

महापालिकेच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी ज्यांनी प्रथम अर्ज केला, त्यांना मेळावा घेण्याची संधी देण्यात यावी, असं वक्तव्य कोर्टानं केलं.
शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही जोरदार प्रयत्न केले. मात्र कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटात उत्साह संचारला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मात्र, हायकोर्टाच्या या निकालाविरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु केली आहे. तर दसरा मेळाव्याआधीच सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील खटल्याचीही सुनावणी होणार असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत.

घटनातज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला तर?

दरम्यान, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी या खटल्यासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. 27 तारखेच्या सुनावणीत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल लागण्याची शक्यता आहे. तसंच पक्षांतर बंदी कायद्यानुसार, शिवसेनेतून सुरुवातीला बाहेर पडलेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई योग्य ठरवली जाईल आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समावेश असल्याने हे सरकार कोसळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

घटनातज्ज्ञ काय म्हणाले पहा-