OBC Reservation: एकनाथ शिंदेंच्या अजेंड्यावर फडणवीसच सरसावले, ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक, काय करतायत तेही सांगितलं

| Updated on: Jul 01, 2022 | 8:36 PM

ओबीसी आरक्षणासंदर्भात आतापर्यंत काम कुठपर्यंत झालं आहे, याचा आढावा घेतला. सर्वेक्षण योग्य पद्धतीनं झालंय की नाही, याचाही आढावा घेतला आहे. मला विश्वास आहे की, योग्य वेळेत हे काम पूर्ण करू, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

OBC Reservation: एकनाथ शिंदेंच्या अजेंड्यावर फडणवीसच सरसावले, ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक, काय करतायत तेही सांगितलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अजेंड्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावल्याचं आज पाहायला मिळालं. ओबीसी आरक्षणासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात काय करताहेत तेही सर्व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी समाजाच्या संदर्भात विशेषतः ओबीसींचं राजकीय आरक्षण हे महाराष्ट्रात संपुष्ठात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं वारंवार इम्पेरिकल डेटा (Imperial Data) सादर करा म्हणून सांगितलं. त्यामुळं मी स्वतः त्यासंदर्भातील आढावा बैठक (Review Meeting) घेतली. पुढच्या तारखेच्या आत आपला रिपोर्ट आला पाहिजे. तो योग्य रिपोर्ट आला पाहिजे. तो रिपोर्ट सादर झाला पाहिजे. न्यायालयात (Court) तो स्वीकारलाही गेला पाहिजे. यासंदर्भात काय काय करता येईल, याची चर्चा केली, असल्याचं त्यांनी सांगितलं.

योग्य वेळेत काम पूर्ण होईल

ते म्हणाले, ओबीसी आरक्षणासंदर्भात आतापर्यंत काम कुठपर्यंत झालं आहे, याचा आढावा घेतला. सर्वेक्षण योग्य पद्धतीनं झालंय की नाही, याचाही आढावा घेतला आहे. मला विश्वास आहे की, योग्य वेळेत हे काम पूर्ण करू, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एकंदरित ओबीसी आरक्षणासाठी जे काही करता येईल. याची सर्व तयारी सुरू झाली आहे. त्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. न्यायालयात राज्य सरकारची भूमिका कशी टीकेल, याची तयारी केली जात असल्याचंही ते म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातही सूचना

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आज एक बैठक झाली. या बैठकीत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ, यासोबत सर्व विभागीय आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थानाशी संबंधित सर्व विभागाचे लोकं उपस्थित होते. जवळपास दीड-दोन तास हा सर्व आढावा चालला. सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे या सर्वांनी काय उपाययोजना केल्यात. मुंबईत ट्रेन बंद केल्यात तर काय उपाययोजना केल्यात. कोकणाचा विचार केल्यास भूस्खलना संदर्भात काही योजना काय आहेत. या सर्वासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा