AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये अभद्र युतीनंतर आता नगरसेवकांवर कारवाई

अहमदनगर : महापौर आणि उपमहापौरपदासाठी अहमदनगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा यांची युती झाली. या छुप्या युतीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली. पण आता पक्षाच्या इच्छेविरोधात झालेल्या या युतीनंतर नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]

नगरमध्ये अभद्र युतीनंतर आता नगरसेवकांवर कारवाई
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share

अहमदनगर : महापौर आणि उपमहापौरपदासाठी अहमदनगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा यांची युती झाली. या छुप्या युतीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली. पण आता पक्षाच्या इच्छेविरोधात झालेल्या या युतीनंतर नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच बसपाने आपले उमेदवार उभे केले होते आणि ते उमेदवार निवडूनही आले. मात्र आता त्या नगरसेवकांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. वाचा – अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नोटीस

अहमदनगरला राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपला मतदान केल्याप्रकरणी पक्षाकडून नोटीस आली आहे. तर याबाबत सर्व नगरसेवक मिळून निर्णय घेणार असून पक्षाला सर्व नगरसेवक एकत्रित चर्चा करून एकच उत्तर देणारं असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय. नगरसेवकांच्या उत्तरावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आम्ही भाजपला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करू, असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. वाचा – राज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

महापौर निवडणुकीत नेमकं काय घडलं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...