‘जयंत पाटील यांचा बाप आला’ पडळकरांच्या समर्थकांच्या घोषणा, तणावाची स्थिती; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वातावरण तापलं!

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जयंत पाटील यांचा बाप आला पडळकरांच्या समर्थकांच्या घोषणा, तणावाची स्थिती; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वातावरण तापलं!
gopichand padalkar and jayant patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 7:28 PM

Sangli Bank Election : राज्यात सांगली जिल्हा बँकेची निवडणूक सगळीकडे चर्चेचा विषय ठरलीय. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक खूपच महत्त्वाची आहे. दरम्यान, ही निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झालेली असतानाच विशाल पाटील यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध कशी राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलेय. गोपीचंद पडळकर यांनीही या निवडणुकीत उडी घेतलीय. त्यांनी बैलगाडीतून येत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी ‘कोण आला रे कोण आला, जयंत पाटील यांचा बाप आला’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह शेकडे समर्थक उपस्थित होते. बैलगाडी रॅली काढत तसेच बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केलाय.

Loading...

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडत असून उद्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. गेल्या तीन दिवसात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आजी-माजी खासदार, आमदार व कुटुंबीयासह दीडशेहून अधिक जणांना उमेदवारी दाखल केलाय. गोपीचंद पडळकर आत अर्ज भरायला आत गेले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. “कोण आला रे कोण आला, जयंत पाटील यांचा बाप आला” अशा घोषणा देण्यात आल्या. अशा प्रकारच्या घोषणाबाजीमुळे बँक कार्यालयात आणि परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला.

दुसरीकडे विशाल पाटील यांनीही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकीकडे बँक निवडणूक तर दुसरीकडे दुष्काळ परिस्थिती आहे. जिल्ह्याचा खासदार म्हणून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us