धनगर समाजाचा वैचारिक शत्रू कोण… दसऱ्या मेळाव्यात पडळकरांची जहरी टीका…

| Updated on: Oct 02, 2022 | 9:14 PM

धनगर समाजाचा वैचारिक शत्रू जर कोणी असेल तर ते बारामतीचे शरदचंद्र पवार असल्याचे पडळकर यांनी म्हणत दसरा मेळाव्यात आरेवाडी हे शक्तीकेंद्र बनलं पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

धनगर समाजाचा वैचारिक शत्रू कोण... दसऱ्या मेळाव्यात पडळकरांची जहरी टीका...
Image Credit source: Google
Follow us on

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, सांगली : धनगर समाजाचा वैचारिक शत्रू हे बारामतीचे शदचंद्रजी पवार (sharad Pawar) आहे अशी जहरी टीका करत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Pawar) यांनी दसऱ्या मेळाव्यात तूफान फटकेबाजी केली आहे. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणापासून ते आरेवाडी देशाची राजधानी झाली पाहिजे असे विविध मुद्दे मांडत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यावर भाषणादरम्यान जोरदार टीका केली आहे. याशिवाय शरद पवार हेलिकॉप्टर मधून आले तर तुम्ही म्हणतात साहेब आले…साहेब आले असे म्हणत ते तुम्ही टोपी पडे पर्यन्त करतात, ते करू नका त्या हेलिकॉप्टरमध्ये तुमचा कर्दनकाळ बसला आहे अशी जहरी टीका पडळकर यांनी केलीय. सांगली येथील आरेवाडीमध्ये झालेल्या दसऱ्या मेळाव्यात गोपीचंद पडळकर बोलत होते.

या दरम्यान पवारांनी कधी अहिल्यादेवीची जयंती केली आहे का ? आणि पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी हार घालत फिरत आहे याआधी कधी फिरलेत का ? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित आहे.

धनगर समाजाचा वैचारिक शत्रू जर कोणी असेल तर ते बारामतीचे शरदचंद्र पवार असल्याचे पडळकर यांनी म्हणत दसरा मेळाव्यात आरेवाडी हे शक्तीकेंद्र बनलं पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

राजकारणामध्ये धनगर समाजाने पुढे आलं पाहिजे. बोललं पाहिजे तुम्ही शांत राहून चालणार नाही, मी वाटलं तर खाली बसतो दुसरं कुणी तरी बोला. पण सगळ्यांनी एकजूट करा असेही पडळकर म्हणाले.

पवार नावाच्या जातीनं आपलं रक्त शोषण करून पिल आहे. या राज्यात सर्वात जास्त मराठा जातीचे नुकसान करणारं कोण असेल तर शरद पवार आहे असेही टीका यावेळी पडळकर यांनी केली.

येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिरोबाचं बन ठरेल. आरेवाडी प्रेरणास्थान होऊ शकते म्हणून त्यांनी खोडा दसरा मेळाव्याला घातला होता.

पवारांचं सरकार सत्तेवर होतं त्यावेळी ओबीसीची फाईल जाग्यावरून हलली नाही. मात्र आपलं सरकार सत्तेवर आल्यावर 72 हजार ओबीसी वस्तीगृह मंजूर करून दिली.

आरेवाडी मध्ये राष्ट्रीय कुस्ती केंद्र उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आरेवाडी ट्रस्टला मी सांगू इच्छितो की, आरेवाडी ट्रस्टला लागेल तेवढी मदत देण्याचे काम मी करत आहे.

आम्ही दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही परत कधी येत नाही. कारण आम्ही भानगडी करायला येत नसतो असाही टोला पडळकर यांनी लगावला आहे.