
मुंबई : आज राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचे निकाल (Gram panchayat Election Result 2022) झाले आहेत. त्यामुळे पुन्हा राजकीय विषय चर्चेत आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या (Maharashtra Politics) दिग्गज राजकारण्यांना आपला गड ग्रामपंचायतीमध्ये राखता आलेला नाही. भाजप (BJP), महाविकास आघाडी,शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार चुरस पाहायला मिळाली. 16 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये 14 ग्रामपंचातीवर महाविकास आघाडीचा (MVA) झेंडा आहे.
16 पैकी 14 ग्रामपंचातीवर महाविकास आघाडीचा झेंडा
माणगाव तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. 16 ग्रामपंचायतीसाठी दोन टप्प्यात मतमोजणी करण्यात झाली. पहिल्या टप्यात 8 ग्रामपंच्यातींची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये कुंभे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा सरपंच निवडून आले, तर न्हावे, शिरवली, नांदवी, कुमशेत, दहिवली, कोंड, पहेल या ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. शिंदे गटाला पहिल्या टप्प्यात पुर्णपणे अपयश आल्याचे पाहायला मिळाले.
दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीत 8 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मांगरूळ ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाला विजय मिळाला. तर भागाड, मुठवली तळे, हरकोल, होडगाव, चिंचवली, साई, गोरेगाव ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला. माणगांवमध्ये महाविकास आघाडीने एकूण 14 ग्रामपंचायतीवर बाजी मारली असून बाळासाहेबांची शिवसेनेला एक तर ग्रामविकास आघाडीला एक जागा मिळाली आहे.