Video : जैसी करनी वैसी भरनी, गुणरत्न सदावर्तेनी उडवली अनिल परबांची खिल्ली

Video : जैसी करनी वैसी भरनी, गुणरत्न सदावर्तेनी उडवली अनिल परबांची खिल्ली
णरत्न सदावर्तेनी उडवली अनिल परबांची खिल्ली
Image Credit source: tv9 marathi

जैसी करनी वैसी भरनी असं गुणरत्न सदावर्ते त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले कामगार देखील जैसी करनी वैसी भरनी असं म्हणत आहेत.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 26, 2022 | 2:58 PM

मुंबई – अनिल परब (Anil Parab) यांच्यांशी संबंधित मालमत्तेवरती सकाळपासून ईडीची (ED) छापेमारी सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सुडबु्द्धीने कारवाई सुरू असल्याची टीका केंद्रावरती केली आहे. तर विरोधकांनी गुन्हा केल्याने त्यांच्यावरती कारवाई केली जात असं म्हटलं जात आहे. राज्यातलं राजकारण तापलेलं असताना गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते काही कामगारांसोबत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. त्याचबरोबर जैसी करनी वैसी भरनी एक वाक्य जोर जोरात म्हणत आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या व्हिडीओ मिठाई वाटून आनंद साजरा केला आहे.

व्हिडीओत काय आहे

जैसी करनी वैसी भरनी असं गुणरत्न सदावर्ते त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले कामगार देखील जैसी करनी वैसी भरनी असं म्हणत आहेत. कामगारांना आणि सदावर्ते यांना अतिशय आनंद झाला असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत आहे. जैसी करनी वैसी भरनी असं म्हणून आनंद साजरा केल्यानंतर..जशी ज्याची करणी तशी त्याची भरणी, त्यामुळं जे काय होतंय ते योग्य होतंय, संविधानिक होतंय. प्रत्येकाच्या आयु्ष्यात सुख दु:ख असतात. या देशाला ज्यांनी पैशाचा भ्रष्टाचार करून पोखरायला सुरूवात केली. त्यातल्या कुणाला तरी पकडलं जात आहे. त्यानिमित्ताने हे कष्टकरी एकत्र आले आहेत. जे योग्य होतंय त्यासाठी लाडू आहेत. कारण आम्ही जेलमध्ये जाताना भारत माता की जय म्हणत होतो. जेव्हा आज कुणीतरी मनी लॉन्ड्रींगच्या केसमध्ये गुन्हा दाखल होतोय म्हणून तेव्हा ते फटीतून दिसत आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले कामगार गुणरत्न सदावर्ते यांना यांना लाडू भरवतात असं व्हिडीओत सगळं व्हिडीओत दिसत आहे.

छापे मनी लाँड्रिंग आणि जमीन खरेदीसंदर्भात सुरू

महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे छापे मनी लाँड्रिंग आणि जमीन खरेदीसंदर्भात सुरू असलेल्या तपासाशी संबंधित आहेत. ईडीने शिवसेना नेते परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

हे सुद्धा वाचा

परब यांच्या मुंबईतील निवासस्थानावर तसेच पुणे आणि दापोली येथील त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें