AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Natioanl Politics | काही तरी मोठ घडणार, ‘या’ नेत्याची पत्नी लगेच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची संभाळणार का?

Natioanl Politics | सध्या देशाच्या राजकारणात काहीही घडू शकत. नुकतच बिहारमध्ये सत्तांतर झालं. आता आणखी एका राज्यात असं सत्तांतर होणार नाही. पण मुख्यमंत्री बदल होऊ शकतो. विद्यमान मुख्यमंत्र्याची जागा त्याची पत्नी घेऊ शकते.

Natioanl Politics | काही तरी मोठ घडणार, 'या' नेत्याची पत्नी लगेच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची संभाळणार का?
kalpana soren
| Updated on: Jan 30, 2024 | 5:45 PM
Share

Natioanl Politics | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन त्यांची जागा घेऊ शकते. दिल्लीतील निवासस्थानी ईडीची धाड पडल्यानंतर हेमंत सोरेन गायब झाले होते. आज रांची येथील निवासस्थानी त्यांची पक्ष नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीला त्यांची पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित आहे. ईडीने त्यांच्या निवासस्थानाहून एक BMW कार आणि रोख रक्कम जप्त केलीय. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी हेमंत सोरेन यांच्याजागी त्यांची पत्नी कल्पना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळेल असा दावा केला आहे.

हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन आमदार नाहीय. पण त्या बैठकीला हजर होत्या. कल्पना सोरेने मुख्यमंत्रीपद संभाळणार असं बोलल जातय. कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी जेएमएम आमदार सरफराज अहमद यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे. अहमद गांडेय मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिले आहेत. दोनवेळा त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. 2019 विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये प्रवेश केला.

कोण आहेत कल्पना?

कल्पना ओदिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात रहायच्या. हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गृह जिल्हा आहे. 43 वर्षीय कल्पना सोरेन यांच्याकडे एमबीए आणि इंजीनियरिंगची डिग्री आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “कल्पना या चांगल्या शिकलेल्या असून त्यांच्यात आत्मविश्वास आहे. झामुमोमध्ये त्यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळेल. आत आणि बाहेर विरोध होणार नाही” त्यांचा इशारा हेमंत यांचे छोटे बंधु आमदार बसंत सोरेन यांच्याकडे होता.

जैविक शेती करुन शाळा चालवतात

कल्पना जैविक शेती करतात. शाळा चालवतात. काँग्रेसचे 17 आमदार आहेत. त्यांच्याकडे अंतर्गत विषय आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा करणार नाहीत. दुसरा सहकारी पक्ष राजदकडे फक्त एक जागा आहे. अनेक बाबतीत हेमंत सोरेन कल्पना यांचा सल्ला घेतात. दिल्ली पोलिसांना चकमा देऊन हेमंत सोरेन रांचीमध्ये आले. त्यावेळी आमदारांच्या बैठकीला कल्पना सोरेन उपस्थित होत्या.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.