AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीत राहणारा आता चाळीचा विकास करणार, गृहनिर्माणमंत्री आव्हाडांकडून पवारांसाठी भावनिक ट्वीट

एकेकाळी चाळीत राहणारा आता चाळीचा निर्माण करणार, हे फक्त पवार साहेबच करु शकतात, अशा शब्दात आव्हाडांनी शरद पवार यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

चाळीत राहणारा आता चाळीचा विकास करणार, गृहनिर्माणमंत्री आव्हाडांकडून पवारांसाठी भावनिक ट्वीट
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 05, 2020 | 11:51 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे (Thackeray Government Portfolio Announced). यामध्ये राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना गृहनिर्माण हे खातं देण्यात आलं आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार मानले आहेत. एकेकाळी चाळीत राहणारा आता चाळीचा निर्माण करणार, हे फक्त पवार साहेबच करु शकतात, अशा शब्दात आव्हाडांनी शरद पवार यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली (Jitendra Awhad Tweet).

“लहानपणीचा घरचा पत्ता – चाळीचे नाव श्रीपत भवन, खोली क्रमांक 6, वाडिया स्ट्रीट, ताडदेव, मुंबई आणि आज चाळीचा विकास करणार गृहनिर्माण मंत्री पद. ही किमया फक्त आणि फक्त शरद पवार साहेबच करू शकतात. #गृहनिर्माण_मंत्री”, असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचे आभार मानले.

मला गृह खातं हवं : जितेंद्र आव्हाड

दरम्यान, कॅबिनेट मंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना गृह खातं हवं असं सांगितलं होतं. खातेवाटपात त्यांना गृह खातं देण्यात आलं आहे. “तुम्हाला कोणतं मंत्रिमंडळ आवडेल, असे जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब आणि तुम्ही विचारता कोणंत मंत्रिमंडळ देऊ. मला गृह हवं आहे. देताय का सांगा”, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना त्यांच्या मनाप्रमाणे खातं मिळालं आहे.

ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर

राष्ट्रवादी 16 (12 + 04)

अजित पवार (उपमुख्यमंत्री) : वित्त, नियोजन जयंत पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास छगन भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अनिल देशमुख : गृह हसन मुश्रीफ  : ग्राम विकास राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन नवाब मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता राजेश टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण बाळासाहेब पाटील : सहकार, पणन

राष्ट्रवादी – राज्यमंत्री

दत्तात्रय भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

आदिती तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

संजय बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त तनपुरे : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

———–

शिवसेना 14 (10 + 04)

सुभाष देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा एकनाथ शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता दादा भुसे : कृषि, माजी सैनिक कल्याण संदीपान भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन अनिल परब : परिवहन, संसदीय कार्य उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण आदित्य ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) : मृद व जलसंधारण

शिवसेना – राज्यमंत्री

अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

शंभूराज देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

राजेंद्र येड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

—————

काँग्रेस 12 (10 + 02)

बाळासाहेब थोरात : महसूल नितीन राऊत : उर्जा अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) के सी पाडवी : आदिवासी विकास विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य सुनिल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण यशोमती ठाकूर : महिला व बालविकास वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण अस्लम शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

काँग्रेस – राज्यमंत्री

सतेज पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

डॉ. विश्वजीत कदम :  सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

संबंधित बातम्या :

महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर, 10 राज्यमंत्र्यांकडे एकूण किती खाती?

ना जयंत पाटील, ना वळसे पाटील, गृहमंत्रिपदी ‘या’ नेत्याची निवड

ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर, बाळासाहेब थोरातांकडे महसूल तर अजित पवारांना अर्थ खातं

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ