AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा

एकनाथ खडसेंसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास भाजपला खिंडार पडेल, असं राष्ट्रवादीचे जालना जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांना वाटतं.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, स्थानिक नेते उत्सुक, उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराची आशा
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:01 PM
Share

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी आशा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. (Jalgaon NCP Leaders eager to welcome BJP Leader Eknath Khadse in party)

पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना आश्रय देऊ शकते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले.

नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेतले तर पक्षाला जळगावसह खानदेशात फायदा होऊ शकतो, अशी आशा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना असल्याचे बोलले जाते. खडसेंना प्रवेश दिल्यास पक्षाची स्थिती काय असेल, याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडून पवारांनी मते जाणून घेतली.

आगामी काळात होणारी जिल्हा बँक, दूध संघाची निवडणूक, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला फायदा होऊ शकेल. एकनाथ खडसेंसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास भाजपला खिंडार पडेल, असंही रवींद्र भैय्या पाटील यांना वाटतं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे दिसते. खडसे आणि त्यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाल्याचे दिसते. मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, याचा उल्लेख नसून पदाबाबत बोलणी सुरु असल्याचं समजतं. माझ्यासारखा आवाज काढणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. हा आवाज माझा नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.

काय आहे संवाद?

कार्यकर्ता : भाऊ, आपला काहीतरी निर्णय घ्या, आतापण त्यांनी तुम्हाला काही नाही दिलं, पंकजा मुंडेंना दिलं… एकनाथ खडसे : उद्या ठरलं जायचं कार्यकर्ता : जायचं का भाऊ? नक्की? कन्फर्म? एकनाथ खडसे : हो, पण मग गेल्यावर काय करायचं ते सांगतो कार्यकर्ता : भाऊ आता पण त्यांनी तुम्हाला डावललं, आम्ही खूप नाराज आहोत एकनाथ खडसे : अरे जाणार आहे, पण शेवटी पद-बिद काहीतरी ठरलं पाहिजे की नाही कार्यकर्ता : ते पण आहे भाऊ एकनाथ खडसे : नुसतं जाऊन लाचारासारखं बसून राहायचं, पद-बिद काही नाही, नुसतं इकडनं तिकडे. योग्य वेळी जाऊ, या महिन्याभरात जाणार आहे पण पद-बिद ठरल्याशिवाय काही जात नाही

पाहा व्हिडीओ :

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोनच दिवसांपूर्वी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आल. माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. मात्र ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीतही स्थान मिळालेलं नाही. आधी विधानसभा, मग राज्यसभा,  त्यानंतर विधानपरिषद त्यामुळे खडसेंची नाराजी वाढल्याचं बोललं जातं.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काही दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना, खडसेंबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

(Jalgaon NCP Leaders eager to welcome BJP Leader Eknath Khadse in party)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा