Exclusive | एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

Exclusive | एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित, पदावर बोलणी सुरु, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाल्याचे दिसते.

अनिश बेंद्रे

|

Sep 29, 2020 | 7:13 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे. खडसे आणि त्यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाल्याचे दिसते. मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, याचा उल्लेख आढळत नाही. तर पदाबाबत बोलणी सुरु असल्याचं समजतं. (Eknath Khadse alleged audio clip on decision of leaving BJP)

कार्यकर्ता : भाऊ, आपला काहीतरी निर्णय घ्या, आतापण त्यांनी तुम्हाला काही नाही दिलं, पंकजा मुंडेंना दिलं… एकनाथ खडसे : उद्या ठरलं जायचं कार्यकर्ता : जायचं का भाऊ? नक्की? कन्फर्म? एकनाथ खडसे : हो, पण मग गेल्यावर काय करायचं ते सांगतो कार्यकर्ता : भाऊ आता पण त्यांनी तुम्हाला डावललं, आम्ही खूप नाराज आहोत एकनाथ खडसे : अरे जाणार आहे, पण शेवटी पद-बिद काहीतरी ठरलं पाहिजे की नाही कार्यकर्ता : ते पण आहे भाऊ एकनाथ खडसे : नुसतं जाऊन लाचारासारखं बसून राहायचं, पद-बिद काही नाही, नुसतं इकडनं तिकडे. योग्य वेळी जाऊ, या महिन्याभरात जाणार आहे पण पद-बिद ठरल्याशिवाय काही जात नाही

दरम्यान, माझ्यासारखा आवाज काढणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. हा आवाज माझा नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काही दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना, खडसेंबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं सांगितलं. (Eknath Khadse alleged audio clip on decision of leaving BJP)

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही

(Eknath Khadse alleged audio clip on decision of leaving BJP)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें