AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद निवडणूक : घोषणा करतावेळीच या उमेदवारांच्या विजयाची जयंत पाटलांना खात्री

राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघात (Teacher and Graduate Constituency Election 2020)  अरुण अण्णा लाड तर औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

विधानपरिषद निवडणूक : घोषणा करतावेळीच या उमेदवारांच्या विजयाची जयंत पाटलांना खात्री
| Updated on: Nov 12, 2020 | 10:17 AM
Share

मुंबई :  राष्ट्रवादीने (NCP) पुणे पदवीधर मतदारसंघात (Graduate Constituency Election 2020) अरुण अण्णा लाड (Arun Anna Lad) तर औरंगाबादमधून सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा करतावेळीच लाड आणि चव्हाण यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. (jayant patil tweet on Arun Lad And Satish Chavan over Graduate Constituency Election 2020)

“विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचेअरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील”, असा विश्वास पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा निर्धार अरुण लाड आणि सतिश चव्हाण यांनी बोलून दाखवला आहे.

कोण आहेत अरुण अण्णा लाड

पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत.

कोण आहेत सतिश चव्हाण

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचंच ते प्रतिनिधित्व करतात. शैक्षणिक प्रश्नांवर सतिश चव्हाण यांचं चांगलं काम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून सतिश चव्हाण यांची ओळख आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघ

राष्ट्रवादीकडून अरुण लाड 9Arun Lad) यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने (Pratap Mane) यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून (BJP) संग्रामसिंह देशमुख (Sangram Deshmukh) आणि मनसेकडून रुपाली पाटील (Rupali Patil) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

राष्ट्रवादीने औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. औरंगाबादेत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे (Pravin Ghuge) आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे (Ramesh Pokle) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण, अरुण लाड यांचं नाव जाहीर होताच प्रताप मानेंचा अर्ज

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...