पुणे पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण, अरुण लाड यांचं नाव जाहीर होताच प्रताप मानेंचा अर्ज

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 9:52 AM, 12 Nov 2020
पुणे पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण, अरुण लाड यांचं नाव जाहीर होताच प्रताप मानेंचा अर्ज

सांगली : पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून (Teacher and Graduate Constituency Election 2020) राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड (Arun Anna Lad) यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी  जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक – क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत (Teacher and Graduate Constituency Election 2020).

राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्याने, राष्ट्रवादीला (NCP) बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. कारण, राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने (Pratap Mane) यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून (BJP) संग्रामसिंह देशमुख (Sangram Deshmukh) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

मतदार संघ हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा असला तरी, दोन्ही पक्षांचे उमेदवार सांगली जिल्ह्यातले असल्याने या निवडणुकीची युद्धभूमी ही सांगली जिल्हा असणार आहे.

मागील पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणाऱ्या अरुण अण्णा लाड यांना तब्बल 48 हजार इतकी मत पडली होती. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार सारंग पाटील यांना पन्नास हजाराच्या आसपास मत पडली होती. तर भाजपचे विजयी उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना 52 हजाराच्या आसपास मते पडली होती. अरुण लाड यांच्या त्या वेळच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी’च्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

या मतदारसंघात अरुण अण्णा लाड यांनी यावेळी सुद्धा जोरदार तयारी केली आहे. यावेळी त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी परिस्थिती असताना. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव याच मतदारसंघातील भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून अगोदरच उमेदवारी जाहीर केली.

पलूस-कडेगाव मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय संपतराव देशमुख हे दोन गट अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत. पक्ष कोणते ही असले तरी, लाड आणि देशमुख या दोन्ही गटांनी नेहमी प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना मदत केली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदा घराण्यातील उमेदवार एकमेकांच्या थेट समोरासमोर उभे राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जनता दलाकडून शरद पाटील यांचा उमेदवारी देण्यात आली आहे. तर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसचे, संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रचंड चुरशीची बनली आहे.

Teacher and Graduate Constituency Election 2020

संबंधित बातम्या :

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट