पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

अनिश बेंद्रे

|

Updated on: Nov 09, 2020 | 12:53 PM

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

नवी दिल्ली : भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या (Teacher and Graduate Constituency Election 2020) चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप (BJP) केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर (Shirish Boralkar), पुण्यातून संग्राम देशमुख (Sangram Deshmukh), नागपुरातून संदीप जोशी (Sandeep Joshi) आणि अमरावतीतून नितीन धांडे (Nitin Dhande) यांना भाजपने तिकीट दिले आहे. (Pune Teacher and Graduate Constituency Election 2020 BJP Candidates declared)

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील चार, तर उत्तर प्रदेशातील नऊ जागांवर भाजपने उमेदवार घोषित केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपतर्फे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत.

“मतदार चांगल्या पद्धतीचं मतदान करतील. मागील निवडणुकीची परिस्थितीत वेगळी होती. यावेळी परिस्थिती चांगली आहे. 2014 आणि 2020 च्या परिस्थितीत फरक आहे” अशी प्रतिक्रिया शिरीष बोराळकर यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.

“नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन. सहा महिन्यांपासून काम सुरु होते. भाजपचा गड कायम राखण्याचा प्रयत्न राहील” अशी ग्वाही  संदीप जोशी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप) vs महाविकास आघाडी vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs अभिजीत बिचुकले

नागपुरातून रिंगणात कोण?

अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप)

(Pune teacher and graduate constituency election 2020 BJP Candidates declared)

पुण्यातून कोण होते शर्यतीत?

पुणे पदवीधर मतदारसंघातून मराठा उमेदवार दिला जाण्याची चर्चा होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळल्याने मोहोळ यांना महापालिकेतून विधीमंडळात पाठवून बक्षिसी दिली जाऊ शकते, असं बोललं जायचं.

माजी राज्यमंत्री बाळा उर्फ रवींद्र भेगडे यांनाही पुण्यातून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा तब्बल 94 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे भेगडेंच्या पुनर्वसनासाठी त्यांना विधानपरिषदेत संधी मिळण्याची शक्यता होती. याशिवाय अभाविपचे राजेश पांडे यांचं नावही पुणे मतदारसंघातून भाजपतर्फे शर्यतीत होतं.

संबंधित बातम्या :

विधानसभेला दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला, रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे पदवीधर निवडणुकीचे तिकीट

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढणारे अभिजित बिचुकले आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात

(Pune teacher and graduate constituency election 2020 BJP Candidates declared)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI