LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा यापेक्षा अर्धी गर्दी होती, यंदा दुप्पट गर्दी आहे, तुमच्या प्रेमाला, विश्वासाला माझं नमन – पंतप्रधान नरेंद्र मोदी

निर्णय घेणारे आमचं सरकार, पूर्वी घोटाळेबाज सरकार होतं, जग भारताकडे महासत्ता या नजरेनं पाहतोय देश इमानदार चौकीदारचा की भ्रष्टाचाराचा? हे ठरवावं लागेल, आमचे बुलंद इरादे आहेत, देशात रोज स्फोट होत होते, या स्फोटात अनेकांचे मृत्यू झाले, पाच वर्षात चौकीदर असताना स्फोट कुठे गेले एक चूक भारी ठरेल, हा संदेश दिला,

आम्ही घरात घुसून मारण्याची परवानगी दिली – तुम्ही खुश आहात मात्र ज्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जम्मू काश्मीर भारतपासून वेगळा करण्याची भूमिका, हे पाप यांचं आहे, मात्र पवार यांना काय झालं शरद पवारांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी, मात्र तुमची महाआघाडी भारताला दोन पंतप्रधान देण्याच्या तयारीत आहे, जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याची भूमिका पवारांना मान्य आहे का ? – पंतप्रधान

शरद पवार यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन भारताकडे विदेशी चष्म्याने पाहात आहेत- पंतप्रधान

छत्रपती शिवरायांच्या भूमीतले असूनही पवारांना दोन पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरुन झोप कशी येते? – पंतप्रधान मोदी गेल्या पाच वर्षात राज्यात अनेकांना घर, शौचालय, गॅस मिळाला,इनामदार सरकारला मत दिल्यानं शक्य झालं – मोदी

12/04/2019,12:01PM
Picture

मुख्यमंत्र्यांचं नगरमधील भाषण

  • मोदींची मागची सभा याच मैदानावर झाली होती, त्यावेळी नगर आणि शिर्डीची जागा जिंकली होती, यावेळीही तेच होणार, दोन्ही जागा प्रचंड मतांनी जिंकणार
  • दिलीप गांधी तुम्ही चिंता करु नका, आम्ही तुमच्याही पाठिशी उभे आहोत. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक
  • बाळासाहेब विखे पाटील हे पश्चिम भागातील पाणी जिल्ह्यात आणण्याची भूमिका मांडत होते आम्ही नदी जोड प्रकल्प राबवतोय

    12/04/2019,11:45AM
Picture

मोदी नगरमध्ये दाखल

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने विळद घाटात विखे यांच्या शिक्षण संस्थेत दाखल, काँग्रेसचे स्टार प्रचारक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित, दोघांनी नाश्ता केल्याची माहिती

12/04/2019,10:07AM
Picture

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्येच राहणार : सुजय विखे पाटील

राधाकृष्ण विखे-पाटील 100 टक्के काँग्रेसमध्येच राहणार, माध्यमातील बातम्या निराधार, त्यात काही तथ्य नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांची माहिती, मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा

12/04/2019,9:02AM
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा

सुजय विखेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा, मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

12/04/2019,7:33AM
Picture

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नांदेडमध्ये जाहीर सभा

नांदेडमध्ये सभा पार पडल्यानंतर उद्या सोलापूरातही सभेचे आयोजन, नांदेडच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

12/04/2019,7:33AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *