AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, जानकर म्हणतात, मेलो तरी साथ सोडणार नाही

हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण तरी साथ सोडणार नाही. 31 मे रोजी गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या कानात कुर्रर्र केलं," असं रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले. ते भगवानगडावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, जानकर म्हणतात, मेलो तरी साथ सोडणार नाही
मला वाटलं मी धनगर म्हणून जनावराचं खातं दिलं, मराठ्याचीही अवस्था तिच केली, जानकरांची फटकेबाजी
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 3:23 PM
Share

बीड (सावरगाव) : “नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. ते रक्तातच असावं लागतं. रक्तच असावं लागतं. आरशासमोर भाषण केल्याने नेता होत नाही. नेता व्हायला अक्कल लागते. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण तरी साथ सोडणार नाही. 31 मे रोजी गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या कानात कुर्रर्र केलं,” असं रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले. ते भगवानगडावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

… हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता

येवळी बोलताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते. ते ब्राह्मण, मुस्लिमांचे होते. भगवान बाबांना जात नव्हती. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण मुंडे यांनी ऊस तोडणाऱ्या माणसाच्या हातात कोयता देण्याऐवजी त्याला आयपीएस, पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे,” असंदेखील गोपीनाथ मुंडे म्हणाले.

गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली, पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीर राहा

तसेच पुढे बोलताना, आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंची शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. पंकजा मुंडेंच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. सावरगावची निर्मिती कुणी केली. हू ईज क्रिएटर ऑफ सावरगाव. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का ? आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका,” असे आवाहन महादेव जानकर यांनी केले.

इतर बातम्या :

प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?

कामठीत लवकरच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प राबवू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Video: अपंग मालकाचं कुत्रं एक पाय झालं, व्हिडीओ पाहा, कळेल, कुत्र्याला माणसाचा निष्ठावान मित्र का म्हणतात!

(mahadev jankar said he will not leave to pankaja munde and pritam munde)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ