नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो, अजित पवारांची घोषणाबाजी

| Updated on: Jun 19, 2019 | 11:50 AM

एकनाथ खडसे अधिवेशनासाठी सभागृहात येत असताना, विरोधकांनी त्यांच्याकडे बघत घोषणाबाजी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो, अजित पवारांची घोषणाबाजी
Follow us on

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्याची चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. एकीकडे याबाबत विरोध सुरु असताना, दुसरीकडे विरोधकांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी सरकारला टोमणे लगावले.

एकनाथ खडसे अधिवेशनासाठी सभागृहात येत असताना, विरोधकांनी त्यांच्याकडे बघत घोषणाबाजी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो,

निष्ठावंतांना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो,

आयाराम गयारामच्या सरकारचा निषेध असो,

अशा घोषणा राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही आंदोलन केलं. बजेट फोडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणी सायबर क्राईमची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार

दरम्यान, 16 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) बहुप्रतीक्षीत विस्तार पार पडला. यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्र वादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं.  एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीतील भाजपच्या कोट्यातून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

काँग्रेसमधून नुकतेच भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण मंत्रिपद मिळालं आहे, तर राष्ट्रवादीतून महिन्याभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही  रोजगार हमी आणि फलोत्पादन कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.

संबंधित बातम्या 

राज्य मंत्रिमंडळ विस्तार : खातेवाटपही जाहीर, पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?   

राज्य मंत्रिमंडळ विस्तार : 13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू