राज्य मंत्रिमंडळ विस्तार : 13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू 

राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) आज (16 जून) विस्तार होणार आहे. यात नव्याने कुठल्या मंत्र्यांचा समावेश आणि कुठल्या विद्यमान मंत्र्याला बढती मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार : 13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू 

मुंबई : राज्य मंत्रिडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार पार पडला असून, एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीतील भाजपच्या कोट्यातून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

काँग्रेसमधून नुकतेच भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे, तर राष्ट्रवादीतून महिन्याभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) आज (16 जून) विस्तार पार पडला आहे. दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) येऊन ठेपल्याने, शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व निर्माण झालं होतं.

13 जणांचा शपथविधी, सहा जणांना डच्चू 

त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 13 जण मंत्रिपदाची शपथ घेतली, तर सहा विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला गेला आहे. गृहनिर्माण मंत्री आणि घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या प्रकाश मेहता यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. प्रकाश मेहतांसह, राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सहाही मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.

तर राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप), संजय कुटे (भाजप), सुरेश खाडे (भाजप), अनिल बोंडे (भाजप), तानाजी सावंत (शिवसेना), अशोक उईके (भाजप) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान योगेश सागर (भाजप), अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट), संजय (बाळा) भेगडे (भाजप), परिणय रमेश फुके (भाजप),  अतुल सावे – भाजप यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

LIVE UPDATE 

Picture

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अतुल मोरेश्वर सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:33AM
Picture

डॉ. परिणय रमेश फुके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:31AM
Picture

भाजपचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:27AM
Picture

रिपाईचे अविनाश महातेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:27AM
Picture

योगेश सागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:23AM
Picture

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले तानाजी सावंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:21AM
Picture

अशोक रामाजी ऊईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:18AM
Picture

भाजप आमदार अनिल बोंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:15AM
Picture

भाजपच्या सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:13AM
Picture

संजय श्रीराम कुटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:10AM
Picture

आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:07AM
Picture

जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:04AM
Picture

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

16/06/2019,11:01AM
Picture

नव्या मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात

राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुरुवात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव मंत्रिमडळ विस्तारासाठी राजभवनात दाखल

16/06/2019,11:00AM
Picture

थोड्याच वेळात शपथविधीला सुरुवात

16/06/2019,10:53AM
Picture

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची राजभवनात लगबग

16/06/2019,10:40AM
Picture

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची जय्यत तयारी

16/06/2019,10:40AM
Picture

अविनाश महातेकर, डॉ.अनिल बोंडे, तानाजी सावंत, आशिष शेलार शपथविधीसाठी राजभवनात दाखल

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी अविनाश महातेकर, डॉ.अनिल बोंडे, तानाजी सावंत, आशिष शेलार राजभवनात दाखल

16/06/2019,10:19AM
Picture

राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी संभाव्य मंत्री राजभवनात पोहोचण्यास सुरुवात

16/06/2019,10:20AM
Picture

सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा होईल

16/06/2019,9:37AM
Picture

नव्या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी

16/06/2019,9:33AM
Picture

शिवसेनेचा उपमुख्यमंत्री पदासाठी नकार

शिवसेनेत मंत्रिपदावरुन धुसफूस सुरु आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मिळणारं उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे

16/06/2019,8:28AM
Picture

मंत्रिमंडळ विस्तार : विखे, क्षीरसागर, अविनाश महातेकर आज मंत्रिपदाची शपथ घेणार

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतून सेनेते आलेले जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय या विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलं आहे.

16/06/2019,8:27AM
Picture

मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान

रामदास आठवले यांच्या रिपाईलाही मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंकडून अविनाश महातेकर यांचे नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे.

16/06/2019,8:23AM
Picture

मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईचे एक आणि विदर्भातील 2 मंत्र्यांचा समावेश

मुंबईतील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद धोक्यात आहे. तर विदर्भातील पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव राजे सत्यवानराव आत्राम यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईचे एक आणि विदर्भातील 2 मंत्र्यांची वर्णी लागू शकते

16/06/2019,8:21AM
Picture

शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपद

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यात जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत या दोघांची कॅबिनेट पदी वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

16/06/2019,8:07AM
Picture

या पाच विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू

प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री, राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री, विष्णू सावरा आदिवासी विकास मंत्री, प्रवीण पोटे पर्यावऱण राज्यमंत्री, दिलीप कांबळे सामाजिक न्याय राज्यमंत्री

16/06/2019,8:04AM
Picture

राज्य मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या नव्या मंत्र्यांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. त्यानुसार

भाजपच्या नव्या मंत्र्यांंची यादी? राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), आशिष शेलार (भाजप), अनिल बोंडे (भाजप), अतुल सावे (भाजप), संजय भेगडे (भाजप), संजय कुटे (भाजप), सुरेश खाडे (भाजप), अशोक उईके (भाजप), जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना), अविनाश महातेकर (रिपइं-आठवले गट)

16/06/2019,8:00AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *