13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेताच, 6 विद्यमान मंत्र्यांचे राजीनामे

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 भाजपचे मंत्री, 2 शिवसेनेची मंत्री, तर एक रिपाइं-आठवले गटाचे मंत्र्यांचा समावेश आहे.

13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेताच, 6 विद्यमान मंत्र्यांचे राजीनामे
Follow us
| Updated on: Jun 16, 2019 | 12:18 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 भाजपचे मंत्री, 2 शिवसेनेची मंत्री, तर एक रिपाइं-आठवले गटाचे मंत्र्यांचा समावेश आहे. एकूण 8 कॅबिनेट मंत्री, तर 5 राज्यमंत्र्यांनी शपथग्रहण केलं. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होताच, 6 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. गृहनिर्माण मंत्री आणि घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या प्रकाश मेहता यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सहाही मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.

कुठल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले?

  • राजकुमार बडोले – भाजप – सामाजिक न्यायमंत्री
  • प्रकाश मेहता – भाजप – गृहनिर्माण मंत्री
  • विष्णू सावरा – भाजप – आदिवासी विकास मंत्री
  • प्रवीण पोटे – भाजप – पर्यायवरण राज्यमंत्री
  • दिलीप कांबळे – भाजप – सामाजिक न्याय राज्यमंत्री
  • अंबरीश अत्राम – आदिवासी विकास राज्यमंत्री

प्रकाश मेहतांवर घोटाळ्यांचे आरोप

प्रकाश मेहता यांच्यावर घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश मेहतांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार होती आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागलेली नाही.

राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) आज (16 जून) विस्तार झाला आहे. दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) येऊन ठेपल्याने, शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नव्याने कुठल्या मंत्र्यांचा समावेश आणि कुठल्या विद्यमान मंत्र्याला बढती मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे होते.

त्यानुसार आज मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 13 जण मंत्रिपदाची शपथ घेतली. तर पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात विशेष म्हणजे, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याही गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे.

संबंधित बातम्या :

संपूर्ण यादी : राज्य मंत्रिमंडळात 13 नवे चेहरे, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री?

शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!

जयदत्त क्षीरसागर…. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.