AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र येणार का?; गुलाबराव पाटील म्हणतात, भविष्यात कोणताही गट…

आज दिवसभर राज्यातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरै यांनी काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र येणार का?; गुलाबराव पाटील म्हणतात, भविष्यात कोणताही गट...
राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र येणार का?; गुलाबराव पाटील म्हणतात, भविष्यात कोणताही गट...Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 05, 2022 | 4:41 PM
Share

जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे यांनी पवारांची भेट घेतल्याने त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी मोठं विधान केलं. या भेटीतून भविष्यात वेगळं काही निर्माण होईल, असं मिटकरी म्हणाले. मिटकरी यांचं हे विधान ताजं असतानाच शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मिटकरी यांचीच री ओढणारं विधान केलं आहे. भविष्यात कोणताही गट एकत्र येऊ शकतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा हा इशारा भाजपसाठी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

गुलाबराव पाटील मीडियाशी संवाद साधत होते. अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटाची भविष्यात आघाडी होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकारण असू शकत नाही. सुख दुःखात एकमेकांकडे जाणे हे राजकारणाच्या पलिकडचे विषय असतात. मात्र भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात, असं सूचक विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, आज दिवसभर राज्यातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरै यांनी काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.

तर राज्यातील अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहे. तुम्ही त्या नावांची कल्पनाही करणार नाही, असं विधान भाजप नेते गिरीश महाजन केलं आहे. या चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं भाकीत केलं आहे.

दुसरीकडे, शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत मिशन 100ची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात महत्त्वांच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”