AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलकापूर नगरपालिका निवडणूक : माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद

कराड : मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडले. नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक पदांसाठी कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 82 टक्के मतदान झाले. तर उद्या सोमवारी मतमोजणी होणार असून सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील. काँग्रेस आणि भाजपने पक्ष चिन्हावर ही निवडणूक लढवली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते, विठ्ठल […]

मलकापूर नगरपालिका निवडणूक : माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंद
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

कराड : मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडले. नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक पदांसाठी कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 82 टक्के मतदान झाले. तर उद्या सोमवारी मतमोजणी होणार असून सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील.

काँग्रेस आणि भाजपने पक्ष चिन्हावर ही निवडणूक लढवली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मलकापूर शहरात गेल्या महिनाभरात अनेक राजकीय उलाढाली झाल्या. भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपचे नेते, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. त्यामुळे मलकापूरची लढाई पृथ्वीराज चव्हाण विरूध्द चंद्रकांत पाटील अशी रंगलेली दिसली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मलकापूर नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असलेल्या या निवडणुकीत जनतेने कुणाला निवडले आहे, हे तर उद्या मतमोजणी झाल्यावरच कळू शकेल.

संबंधित बातम्या :

पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं!

कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला!

कराड नगरपरिषद निवडणूक जाहीर, माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार

Follow Us
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?