विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार

साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘बाबा विरुद्ध बाबा’ असा जंगी मुकाबला पाहायला मिळणार आहे. कारण पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवासाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून साताऱ्याच्या कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले उर्फ बाबा हेच भाजपचे उमेदवार असतील, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी जाहीरच करुन टाकले. विशेष […]

विलासरावांचा जावई थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना टक्कर देणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘बाबा विरुद्ध बाबा’ असा जंगी मुकाबला पाहायला मिळणार आहे. कारण पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवासाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून साताऱ्याच्या कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले उर्फ बाबा हेच भाजपचे उमेदवार असतील, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी जाहीरच करुन टाकले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांची लढत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्याशी होणार आहे.

“2019 च्या विधानसभा निवडणुकीत कराडमधून अतुल भोसले आमदार होतील. कराडमधून तुम्हाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाडायचं आहे.” – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

दस्तुरखुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारण्याचा विडा उचललेल्या डॉ. अतुल भोसले सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. डॉ. अतुल भोसले उर्फ बाबा हे केवळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला परिचित असले, तरी त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्त्व हे याहून मोठे आणि ठळकपणे सांगण्याची गरज आहे. कारण डॉ. अतुल भोसले हे ‘सहकारमहर्षी’ दिवंगत जयंवतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांचे नातू आहेत. याही पुढे जात डॉ. अतुल भोसले यांची कारकीर्द आणि राजकीय-सामाजिक प्रवास थरारक, विस्मयचकित करणारा आणि कुतुहलजनक आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे जावई

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकारणातील दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे डॉ. अतुल भोसले हे जावई आहेत. ते नाते असे की, विलासरावांचे मोठे बंधू आणि महाराष्ट्राची माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कन्या गौरवी देशमुख हिचा विवाह डॉ. अतुल भोसले यांच्याशी झाला आहे. देशमुख घराण्याचे जावई ही डॉ. अतुल भोसले यांची एक ओळख असली, तरी राजकारणात डॉ. अतुल भोसले यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडण्याऐवजी भाजपच्या ‘कमळा’ला साथ दिली आहे. मात्र, राजकारणाच्या पलिकडे आपली नाती जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही कराडच्या या भोसले कुटुंबीयांची ओळख आहे.

‘सहकारमहर्षी’ दिवंगत जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांचे नातू

महाराष्ट्राला सहकार चळवळीचा मोठा इतिहास आहे. अहमदनगरच्या भूमीत दिवंगत विखे पाटलांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि सहकाराची चळवळ पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याची मोलाची कामगिरी दिवंगत जयवंतराव भोसले यांनी केली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारी चळवळ कराडसह साताऱ्यात रुजवली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाची साखर प्रदान केली. डॉ. अतुल भोसले यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

कृष्णा हॉस्पिटलकडून सेवा

साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात डॉ. अतुल भोसले यांचा जनसंपर्क दांडगा आहे. साताऱ्यातील कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, माण, खटाव, वाई महाबळेश्वर या तालुक्यातील रुग्णांसाठी आपल्या कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून ‘मसिहा’ बनले आहेत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सवलत देऊन अनेक सुविधा दिल्या आहेत. स्वत: अतुल भोसले हे कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

डॉ. अतुल भोसले यांची राजकीय कारकीर्द

क्षेत्राशी भोसले घराण्याचे जवळचे नाते राहिले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी तर त्यांचे कौटुंबीक संबंध होते. मात्र, भोसल्यांच्या नव्या पिढीतील डॉ. अतुल भोसले यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाशी घरोबा केला आहे. भाजपकडूनही त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. आता तर राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या डॉ. अतुल भोसले यांचे राजकीय वजनही वाढलं आहे.

कराडमध्ये डॉ. अतुल भोसले यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तरुणांमध्ये ते विशेष प्रसिद्ध आहेत. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आग्रहामुळे डॉ. अतुल भोसले यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना यश संपादित करता आले नाही. पुढे त्यांनी भाजपची वाट पकडली.

डॉ. अतुल भोसले यांच्याकडे भाजपचं राज्यस्तरीय सरचिटणीसपद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

2014 साली पृथ्वीराज चव्हाणांना टक्कर  

अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला होता, मात्र विलासकाक आणि अतुल भोसलेंनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती. पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड झाली आणि त्यांनी मंदिराचा पूर्णपणे कायापालट केला. विविध योजना, धोरणं राबवून, नव्या संकल्पना अंमलात आणून, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन, डॉ. अतुल भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कायापालट केला.

वारकऱ्यांच्या दर्शन रांगेत सुमारे 8 किलोमीटरचं ‘ग्रीन कार्पेट’ची संकल्पना असो किंवा विठ्ठलाच्या दर्शनासाठी कार्तिकीपासून टोकन असो, चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ राहावे म्हणून ठेकेदार नेमणं असो, किंवा अगदी आता 350 खोल्यांचे सुसज्ज भक्त निवास बांधणं, मंदिराचं मोबाईल अॅप लॉन्च करणे इत्यादी कामं करुन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास करण्याचा डॉ. अतुल भोसले यांनी सपाटा लावला होता.

स्वतंत्र संत विद्यापीठ स्थापन करण्याचा डॉ. अतुल भोसले यांचा मानस आहे. यासाठी वारंवार सरकार दरबारी पाठपुरावा केल्याने डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज संतपीठ नावाची संस्था स्थापन करण्यासाठी 15 तज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कायापालट करण्याचा धडाका पाहून, डॉ. अतुल भोसले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने राज्यमंत्रिपद दिले आहे.

आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच थेट डॉ. अतुल भोसले आव्हान देणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.